सोनार समाजाने एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:12 AM2018-02-05T00:12:09+5:302018-02-05T00:12:33+5:30

संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी सोनार समाजातील बंधू-भगिनींनी एकत्र येऊन शहरातून रॅली काढली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी सोनार समाजाने एकजूट कायम ठेवून समाजाच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले.

The sonar community should be united | सोनार समाजाने एकजूट व्हावे

सोनार समाजाने एकजूट व्हावे

Next
ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : गडचिरोली येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी सोनार समाजातील बंधू-भगिनींनी एकत्र येऊन शहरातून रॅली काढली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी सोनार समाजाने एकजूट कायम ठेवून समाजाच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले.
केमिस्ट भवन येथे आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातून रामधून पालखी काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य दिनकर भरणे, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणपत बांगरे, नामदेव भरणे, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य संजय गजपुरे, कुरखेडा पंचायत समितीचे माजी सदस्य चांगदेव फाये, मदन काळबांधे, पंकज खरवडे, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेव काळबांधे, सुधाकर खरवडे, रामभाऊ काळबांधे, ललित पोगरे, सत्यवान खरवडे, सोनार समाज संघटनेचे अध्यक्ष बंडू कारेमोरे, सोनार समाज युवक अध्यक्ष गजेंद्र डोमळे, सुषमा येवले, अल्का खरवडे उपस्थित होते.
याप्रसंगी पंकज खरवडे यांनी सोनार समाजबांधवांनी सदैव संघटित राहून समाजाच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी चांगदेव फाये, मदन काळबांधे यांनीही मार्गदर्शन केले. संजय गजपुरे यांचा समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अरुण पोगळे, प्रास्ताविक अशोक हाडगे, तर आभार देडूजी बेहरे यांनी मानले. सचिव अशोक हाडगे, उपाध्यक्ष डेडू बेहरे, जगदीश डोमळे, प्रमोद बेहरे, अरूण पोगळे, रमेश भरणे, प्रा. राकेश इनकने, छगन काळबांधे, पंकज हर्षे, श्रीकांत डोमळे, विवेक काळबांधे, आशिष भरणे, मनोज भरणे, अभिलाष डोमळे, किशोर डोमळे, चेतन काळबांधे, महेश काळबांधे, उज्ज्वल कुर्वे, दिलीप काळबांधे, तुळशीदास कारेमोरे, सुरेश भोजापुरे, संध्या पोगळे, कल्पना काळबांधे सहकार्य केले.

Web Title: The sonar community should be united

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.