१९ वर्षांपासून सोनटक्के बंधू जोपासत आहेत गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:43 AM2021-09-08T04:43:45+5:302021-09-08T04:43:45+5:30

आष्टी येथे तीन महिन्यांसाठी कुटुंबाला घेऊन ते वास्तव्य करतात. कोठारी येथून माती आणून गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात करतात. मनोज ...

Sontakke brothers have been cultivating the business of making Ganesha idols for 19 years | १९ वर्षांपासून सोनटक्के बंधू जोपासत आहेत गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय

१९ वर्षांपासून सोनटक्के बंधू जोपासत आहेत गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय

Next

आष्टी येथे तीन महिन्यांसाठी कुटुंबाला घेऊन ते वास्तव्य करतात. कोठारी येथून माती आणून गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात करतात. मनोज आनंदराव सोनटक्के व त्यांचे बंधू सुधीर सोनटक्के हे दोघे भाऊ गणेशाच्या विविध रूपांना आकार देण्याचे काम करीत असतात. दोन महिन्यात गणेशाच्या लहान-मोठ्या दोनशे ते तीनशे मूर्ती बनवितात. त्यानंतर रंगरंगोटी करून गणेशाला सजविण्याचे काम ते करतात. दिवस व रात्री बराच वेळपर्यंत मूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. गणेशमूर्तीची किंमत ३५० रु्पयांपासून सुरू होते. मूर्ती पाहून त्याची किंमत आकारली जाते. या व्यवसायातून त्यांना मिळालेल्या आर्थिक मिळकतीतून ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत असतात. मनोज सोनटक्के हे बाकी दिवस फर्निचर व पेंटिंगचा व्यवसाय करीत असतात.

Web Title: Sontakke brothers have been cultivating the business of making Ganesha idols for 19 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.