सरपंचाने माडिया भाषेतून सांगताच लसीकरणासाठी सरसावले गावकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:34 AM2021-05-22T04:34:06+5:302021-05-22T04:34:06+5:30
सरपंचांनी वैद्यकीय चमूंशी संवाद साधून लसीकरणाची मोहीम २० मे राेजी मोरखंडीत राबविण्यात आली. सरपंच तेलामी यांनी तालुकानिहाय सूक्ष्म कृती ...
सरपंचांनी वैद्यकीय चमूंशी संवाद साधून लसीकरणाची मोहीम २० मे राेजी मोरखंडीत राबविण्यात आली. सरपंच तेलामी यांनी तालुकानिहाय सूक्ष्म कृती आराखडा राबविताना प्रत्यक्ष स्वतः लस घेऊन कृतीतून सिद्ध करून दाखविले व त्यांची आई तुरकी नवलू तेलामी (वय ८५) यांनी लस घेऊन सर्व गावकऱ्यांना माडिया भाषेतून संबोधले. ‘मोरखंडी नाटे नोर कोरोनाता साथचा वायर्स मट्टू येटा ना.’
सर्वांनी हे ऐकताच लसीकरणासाठी गर्दी केली व गैरसमज दूर करून लसीकरण जास्तीत जास्त करावे, असे आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी वाय. पी. लाकडे, विस्तार अधिकारी (पंचायत) साईनाथ साळवे, सचिव एस. बी. जेट्टीवार, आर. सी. सिंग, पी. एस. गादेवार, डॉ. वाट आणि संपूर्ण वैद्यकीय चमू उपस्थित होता. पारंपरिक प्रथासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा अंगीकारणे आवश्यक आहे, असे सरपंच केसरी तेलामी यांनी सांगितले.