अंगणवाडी महिलांचे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा धरणे देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:49 AM2021-02-25T04:49:06+5:302021-02-25T04:49:06+5:30

गडचिराेली : अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न कायम आहेत. त्यांच्या मागण्या निकाली न निघाल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत ...

Sort out the issues of Anganwadi women, otherwise it will be tolerated | अंगणवाडी महिलांचे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा धरणे देणार

अंगणवाडी महिलांचे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा धरणे देणार

googlenewsNext

गडचिराेली : अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न कायम आहेत. त्यांच्या मागण्या निकाली न निघाल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटकप्रणीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा गडचिराेलीच्या वतीने ५ मार्च राेजी जिल्हा परिषदेसमाेर धरणे आंदाेलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा संघटक देवराव चवळे यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पूर्व सूचना म्हणून २२ जानेवारी राेजी निवेदन दिले आहे. अंगणवाडी सेवा समाप्तीनंतर दरमहा मानधनाच्या अर्धी रक्कम पेंशन म्हणून देण्यात यावी, पूर्व प्राथमिक शिक्षिकेचा दर्जा देऊन किमान वेतन लागू करावे, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना एकरकमी याेजनेचा लाभ देण्यात यावा आदी मागण्या आहेत.

Web Title: Sort out the issues of Anganwadi women, otherwise it will be tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.