पुरोगामी विचाराची बिजे पेरा
By admin | Published: June 25, 2017 01:29 AM2017-06-25T01:29:13+5:302017-06-25T01:29:13+5:30
बदलत्या युगात आपल्या समोर कोणती आव्हाने आहेत व त्याला सामोरे जाण्यासाठी पुरोगामी विचारांची बिजे
पुरूषोत्तम खेडेकर यांचे आवाहन : चामोर्शीत जनसंवाद सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : बदलत्या युगात आपल्या समोर कोणती आव्हाने आहेत व त्याला सामोरे जाण्यासाठी पुरोगामी विचारांची बिजे पेरण्याची गरज आहे, त्यासाठी प्रचारक तयार होणे आवश्यक आहे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले.
चामोर्शी येथे प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात शुक्रवारी जनसंवाद सभा पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खेडेकर बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी प्रा. दिलीप चौधरी, विनोद खेरे, काळे, प्रा. संजय म्हस्के, प्रा. राम वासेकर, हिराजी गोहणे, ऋषीदेव कुनघाडकर, ओमप्रकाश साखरे, मंगेश वासेकर, गुरू सातपुते, कविता झाडे, कोमल साखरे, सुनीता बागडे, माजी सरपंच विकास तुमडे, कालिदास पाल आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले, मराठा सेवा संघ ही सेवाभावी संस्था आहे. त्यामुळे या संघाच्या माध्यमातून सेवाभावी काम झाले पाहिजे, लोकांनी या संघात जुळून ही चळवळ व्यापक स्वरूपाची बनवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सभेत मराठा सेवा संघ पुनर्बांधणी संबंधी विविध सामाजिक विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. संचालन गोकुल झाडे तर आभार मारोती दुधबावरे यांनी मानले. यावेळी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.