पेरणी घटली अन् भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 05:00 AM2021-01-02T05:00:00+5:302021-01-02T05:01:02+5:30
२० वर्षांपूर्वी रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेत हाेते. मात्र काही कालावधीनंतर जवस व करडई या दाेन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर शेतकरी खरीप हंगामात साेयाबीनच्या लागवडीकडे वळला हाेता. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : तेलवर्गीय पिकांचे काही वर्षांआधी जिल्ह्यात बऱ्यापैकी उत्पादन घेतले जात हाेते. मात्र भाव पडल्याने शेतकऱ्यांना ताेटा हाेण्यास सुरुवात झाली. परिणामी या पिकांचे क्षेत्र घटले. पण आता तेलाची मागणी वाढली असल्याने तेलवर्गीय पिकांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांकडे पुन्हा वळण्यास त्यांच्या उत्पन्नात चांगली भर पडू शकते.
२० वर्षांपूर्वी रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेत हाेते. मात्र काही कालावधीनंतर जवस व करडई या दाेन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर शेतकरी खरीप हंगामात साेयाबीनच्या लागवडीकडे वळला हाेता. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपर्यंत साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र काही दिवसानंतर भाव पडायला सुरूवात झाली. त्या तुलनेत उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन ऐवजी कापसाची लागवड करण्यास सुरुवात केली. आता तर केवळ ५०० हेक्टरवर साेयाबीनची लागवड केली जात आहे. रबी हंगामात इतर सर्व पिकांना तिलांजली देत येथील शेतकरी आता मका पिकाकडे वळला असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात दरवर्षी मक्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. एवढेच नाही तर आजपर्यंत ज्या शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात हाेते. त्या शेतीत आता मक्याची लागवड केली जात आहे. इतर कडधान्याच्या जमिनीतसुद्धा मका लावला जात आहे. मुरूमगाव, सावरगाव, मालेवाडा यासारख्या दुर्गम भागांमध्ये सुद्धा मक्याची लागवड केली जात आहे.
शेतकऱ्यांना संधी
गडचिराेली जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण तेलबियांच्या पिकांसाठी पाेषक आहे. रबी हंगामात प्रामुख्याने जवस, करडई, भुईमूग, साेयाबीन, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जात हाेते. कालांतराने या पिकांची जागा दुसऱ्या पिकांनी घेतली. आता मात्र तेलवर्गीय पिकांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे या पिकांची पेरणी करून अधिकचे उत्पादन घेण्याची संधी शेतकऱ्यांना आहे.
कमी सिंचनात उत्पादन
तेलवर्गीय पिकांचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे अत्यंत कमी सिंचनात या पिकाचे उत्पादन हाेते. जवस, करडई, भूईमूग या पिकांना तर सिंचनाची अजिबात आवश्यकता राहत नाही. या पिकांवर इतर किडींचाही प्रादुर्भाव हाेत नाही. कीटकनाशके व सिंचनाचा खर्च कमी झाल्याने उत्पादन खर्चात घट हाेते. धान पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेणे शक्य आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.