पेरणी घटली अन् भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:30 AM2021-01-02T04:30:04+5:302021-01-02T04:30:04+5:30
बाॅक्स ......... शेतकऱ्यांना संधी गडचिराेली जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण तेलबियांच्या पिकांसाठी पाेषक आहे. रबी हंगामात प्रामुख्याने जवस, करडई, भुईमूग, ...
बाॅक्स .........
शेतकऱ्यांना संधी
गडचिराेली जिल्ह्यातील शेतजमीन व वातावरण तेलबियांच्या पिकांसाठी पाेषक आहे. रबी हंगामात प्रामुख्याने जवस, करडई, भुईमूग, साेयाबीन, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जात हाेते. कालांतराने या पिकांची जागा दुसऱ्या पिकांनी घेतली. आता मात्र तेलवर्गीय पिकांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे या पिकांची पेरणी करून अधिकचे उत्पादन घेण्याची संधी शेतकऱ्यांना आहे.
बाॅक्स ......
कमी सिंचनात उत्पादन
तेलवर्गीय पिकांचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे अत्यंत कमी सिंचनात या पिकाचे उत्पादन हाेते. जवस, करडई, भूईमूग या पिकांना तर सिंचनाची अजिबात आवश्यकता राहत नाही. या पिकांवर इतर किडींचाही प्रादुर्भाव हाेत नाही. कीटकनाशके व सिंचनाचा खर्च कमी झाल्याने उत्पादन खर्चात घट हाेते. धान पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी जवस, करडई या पिकांचे उत्पादन घेणे शक्य आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
बाॅक्स ........
तेलवर्गीय पिकांचे क्षेत्र
पीक लागवड (हेक्टर)
करडई ३२
जवस ५३०
तीळ ८४.३
सूर्यफूल ०.२
माेहरी ६१
भूईमूग ६२०