पाणी शिरल्याने सोयाबीनचे नुकसान
By admin | Published: October 12, 2015 01:51 AM2015-10-12T01:51:01+5:302015-10-12T01:51:01+5:30
तालुक्यातील विठ्ठलपूर येथील मारोती कुरवटकर या शेतकऱ्याच्या कापणी योग्य सोयाबीनच्या पिकामध्ये नहराचे पाणी शिरल्याने शेती जलमय झाले असून कुरवटकर यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
चामोर्शी : तालुक्यातील विठ्ठलपूर येथील मारोती कुरवटकर या शेतकऱ्याच्या कापणी योग्य सोयाबीनच्या पिकामध्ये नहराचे पाणी शिरल्याने शेती जलमय झाले असून कुरवटकर यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
मारोती कुरवटकर यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. सदर पीक परिपक्व होऊन आता कापणीस तयार झाले आहे. अनेक संकटांचा सामना करीत कुरवटकर यांनी सोयाबीनचे पीक जगविले. मात्र ऐन कापणीच्या तोंडावर नहराचे पाणी सोयाबीन पिकामध्ये शिरले. यासाठी लघू पाटबंधारे विभागाचा नियोजनशुन्य कारभार जबाबदार आहे. गणपूर रै. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून या परिसरातील धानपिकाला उपकालव्यांच्या सहाय्याने पाणी सोडले जाते. मात्र हा कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. या कालव्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन पिकात पाणी शिरले आहे. नुकसानीची पाहणी करून कुरवटकर यांना पाटबंधारे विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)