रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:55 AM2018-07-29T00:55:52+5:302018-07-29T00:56:06+5:30
गडचिरोली-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथील परिवहन मंत्रालयात भेट घेऊन केली आहे.
Next
ठळक मुद्देखासदारांची परिवहनमंत्र्यांकडे मागणी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथील परिवहन मंत्रालयात भेट घेऊन केली आहे.
रेल्वे मार्गासाठी कोणती व किती जमीन संपादीत करायची याचा सर्व्हे झाला आहे. तशा प्रकारचे खांबही गाडण्यात आले आहेत. या रेल्वे मार्गात काही प्रमाणात वनविभागाचीही जमीन जाणार आहे. मात्र वनजमीनीचे संपादन करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाची पुढील प्रक्रिया थांबली आहे. ही बाब खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिली. तसेच नागपूर-नागभीड या ब्राडगेज मार्गाची अंदाजपत्रकीय किंमत वाढल्याने या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री पियूषजी गोयल व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक लावून वाढीव निधीला मंजुरी देऊन काम तात्काळ सुरू करावे. राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण करून जिल्हा विकासाला गती देण्याची मागणी सुद्धा खा. अशोक नेते यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली. यावेळी स्वीय सहाय्यक रवींद्र भांडेकर, सोशल मिडिया प्रमुख आनंद खजांची, अनुप अधेंकीवर उपस्थित होते.