जीवनात विज्ञानासोबत अध्यात्माची जोड गरजेची
By admin | Published: November 9, 2016 02:24 AM2016-11-09T02:24:16+5:302016-11-09T02:24:16+5:30
मानवी जीवन हे धावपळीचे आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड ताण तणावाचा सामना करावा लागतो.
कुरखेडा येथे कार्यक्रम : कानिफनाथ महाराज यांचे प्रतिपादन
कुरखेडा : मानवी जीवन हे धावपळीचे आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड ताण तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे मानवी मन विचलित होते. चित्त शांत ठेवण्यासाठी व सागरासारख्या अथांग मनावर ताबा मिळविण्यासाठी जीवनात विज्ञानासोबत अध्यात्माची जोड देणे गरजेचे आहे. अध्यात्म हा जीवन सुखकर करण्याचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांचे उत्तराधिकारी परमपुज्य कानिफनाथ महाराज यांनी केले.
कुरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर मंगळवारी जगद्गुरू नरेद्रचार्य महाराज भक्तसेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित परमपुज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रवचन, दर्शन व साधक दिक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कानिफनाथ महाराज म्हणाले की, मानवाच्या जीवनात अनेक वाईट व्यसन ही फक्त मानवी शरीरालाच नाही तर मनाला व आत्मविश्वासालाही पोखरत असतात. त्यामुळे जीवनाची सुखशांती हिरावून जाते. मानवाने वाईट व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, जि.प. सदस्य अशोक इंदूरकर, नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, विश्वहिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, ठाणेदार विलास सुपे, रामेश्वर काबरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगद्गुरू भक्तसेवा समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर कुथे, जिल्हा युवा अध्यक्ष क्रिष्णा खरकाडे, जिल्हा महिला अध्यक्ष कविता चिळंगे, सुरेश चिचघरे, सुनिल दुधबळे, सुरेश सहारे, यशवंत चौरीकर, शंकर कोंडावार, गोपी सुकारे, खोटोले, दाताळे, अनिता बोरकर, कुमार मोहने, चरण लांजेवार, श्रीहरी गायकवाड, मांडवे, मोहन कुथे, बाळकृष्ण तलमले, चहांदे, वट्टी, ब्राह्मणवाडे, पेंदाम, प्रेमा कोवे, रघुनाथ तुलावी आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
२८० साधकांनी घेतली दीक्षा
४० लोकांना साहित्य वितरण
या कार्यक्रमात १० गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीन, २० जणांना स्प्रेपंप, १० जणांना ताडपत्री नि:शुल्क वितरित करण्यात आली. या कार्यक्रमात २८० साधकांनी कानिफनाथ महाराजांच्या हस्ते दिक्षा घेतली. या कार्यक्रमस्थळी नरेंद्रचार्य महाराजांच्या पादूका भक्ताच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.