ओटी सजावट व खरी कमाई उपक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: October 20, 2015 01:43 AM2015-10-20T01:43:46+5:302015-10-20T01:43:46+5:30

लोकमत सखी मंच शाखा चामोर्शी व वैरागड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखी

Spontaneous response to the OT decoration and real earnings initiative | ओटी सजावट व खरी कमाई उपक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ओटी सजावट व खरी कमाई उपक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

चामोर्शी/ वैरागड : लोकमत सखी मंच शाखा चामोर्शी व वैरागड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना सखी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
चामोर्शी येथे युनिक ग्रुप व मातोश्री शारदा मंडळ तेलंग मोहल्ला यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री शारदा मंडळ नवरात्र उत्सवानिमित्त ओटी सजावट व बिस्किटांपासून नेकलेस व कानातले दागिने तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयोजिका चैताली चांदेकर, गटप्रमुख अमृता आर्इंचवार, शारदा मंडळाच्या अध्यक्ष संध्या बोधनवार, उपाध्यक्ष विजया कनकुरलावार उपस्थित होत्या. ओटी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक नैना प्रभाकर श्रीरामे, द्वितीय क्रमांक अनिता बोकडे यांनी पटकाविला. बिस्किटांपासून नेकलेस व कानातले दागिने तयार करण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता बोकडे, द्वितीय क्रमांक प्रीती भोगावार यांनी पटकाविला. लकी लेडी म्हणून प्रीती भोगावार यांची निवड करण्यात आली.
वन मिनीट गेम शो स्पर्धेत अनिता बोकडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण चैताली चांदेकर, आरती भिमनवार यांनी केले. यावेळी रिता खडसे, कांचन चकोर, शारदा मंडळाच्या रेखा बोडगेवार, लता बोडगेवार, संगीता करंगीलवार, वर्षा कोत्तावार, पद्मा कोत्तावार, गीता श्रीरामे यांनी सहकार्य केले.
वैरागड येथील गांधी चौकात दुर्गा मातेच्या मंदिरासमोर खरी कमाई, विविध खाद्यपदार्थ विक्री कार्यक्रम व आनंद मेळावा घेण्यात आला. शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात सखी सदस्यांनी पाणीपुरी, दोसा, लहान मुलांना आवडणाऱ्या वस्तू तयार केल्या. त्यानंतर सदर पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले.
यावेळी सुभाष हर्षे, विजय गुरनुले, राजू चौधरी, गुरूदेव लोखंडे, मोरेश्वर पगाडे, सुनील गेडाम, प्रा. प्रदीप बोडणे, गंगाधर लांजीकार उपस्थित होते. कार्यक्रमात सरिता हर्षे, प्रा. वर्षा चौधरी, विद्या खडसे, आशा भारती, अस्मिता लोखंडे यांनी विविध पदार्थांचा वापर करून सजावट केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता विखार, सरिता कावळे, धारगावे, अंजली कोसे, दुशिला लाडे, प्राणहिता लाऊतकर, संगीता मेश्राम, नवदुर्गा उत्सव मंडळाचे गाविलदास पंडेलगोत, सोनु लांजिकार, अक्षय भोवते, आशिष सोमनकर, कोविद खरवडे, दत्त हर्षे यांनी सहकार्य केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

बुधवारी देसाईगंजात ओटी सजावट स्पर्धा
लोकमत सखी मंच शाखा देसाईगंजच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त बुधवारी २१ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता समता शारदा महिला मंडळ गांधी वॉर्डात ओटी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सखींनी कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका संयोजिका कल्पना कापसे (९४२११०१७०५) यांनी केले आहे.

Web Title: Spontaneous response to the OT decoration and real earnings initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.