लोकमत सखीमंच सदस्यांचा वृक्षारोपणात उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: July 2, 2016 01:28 AM2016-07-02T01:28:19+5:302016-07-02T01:28:19+5:30

लोकमत सखी मंचाने राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात पाच हजारावर अधिक वृक्षांची लागवड शुक्रवारी केली.

Spontaneous response to the tree plantation of members of the common people | लोकमत सखीमंच सदस्यांचा वृक्षारोपणात उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत सखीमंच सदस्यांचा वृक्षारोपणात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

गडचिरोली : लोकमत सखी मंचाने राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात पाच हजारावर अधिक वृक्षांची लागवड शुक्रवारी केली.
गडचिरोली येथील वन विभाग कार्यालयाच्या बाजुला सीसीएफ डेपो पोटेगाव चांदाळा रोड येथे सकाळी ११ वाजता उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, वन परिक्षेत्राधिकारी एम. पी. चांगले, डेपोचे वन परिक्षेत्राधिकारी यू. के. माणुसमारे, यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी सखी संयोजिका प्रिती मेश्राम, किरण पवार, वर्षा पडघन, सोनिया बैस, सहायक वन परिक्षेत्राधिकारी नाईकवाडे, घोंगले, कुळमेथे, भांडेकर, हजारे, गुरपुडे, बैस, धात्रक, डी. डी. दिकोंडवार, भारती खोब्रागडे, रोहिणी मेश्राम, सुनिता उरकुडे, उज्ज्वला साखरे, उषा भानारकर, पुष्पलता देवकुले, पुष्पा पाठक, अंजली वैरागडवार, शारदा खंडागळे, वंदना दरेकर, उर्मिला गुरपुडे, सुनिता गुज्जनवार, भारती येनगंटीवार, उमरे, गावड, आशा खांडेकर, गहाणे, करंबे, निळा निंदेकर, मुनगंटीवार, सजनपवार, मोंगरकार, कन्नाके, मसराम उपस्थित होते.
लोकमत सखीमंच आष्टीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम शुक्रवारी ग्रामीण रूग्णालय परिसरात राबविण्यात आला. भर पावसात सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. यावेळी संयोजिका प्रज्ञा फरकाडे, विजया सालुरकर, विजया पंदिलवार, लता रामटेके, ललीता आत्राम, प्रतिभा पेचे, सुमित्रा बिश्वास उपस्थित होत्या. वृक्षामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होत असल्याने नागरिकांनी वृक्षारोपण करून याचे संवर्धन करावे, असे आवाहन प्रज्ञा फरकाडे यांनी केले.
लोकमत सखी मंच वैरागडच्या वतीने शुक्रवारी भंडारेश्वर देवस्थान तसेच नदी लगतच्या पेट्रोल पंपाजवळून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वर्षा चौधरी, आशा भारती, अस्मिता लोखंडे, संध्या बुध्दे, दुशिला लाडे, संगीता पेंदाम, निर्मला क्षीरसागर, अंजली कोसे, सरिता कावळे, नूतन लाऊतकर, विद्या खडसे, अनुजा श्रीप्रेमवार, जोत्स्ना बोडणे, मनीषा राऊत, विभा आंबोरकर, वर्षा धाईत, रूपा ठाकरे, मनीषा चाकडे, संध्या नागोसे व सदस्य उपस्थित होते.
लोकमत संखी मंच मुलचेराच्या वतीने विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी संयोजिका स्मिता चापले, योगीता देवतळे, लता गुडपल्ले, बोडावार, मुद्रालवार, बिश्वास, मुहार, गजभिये व विद्यार्थी उपस्थित होते.
लोकमत सखी मंच अहेरीच्या वतीने किष्टापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभारी उपवनसंरक्षक जगताप, क्षेत्र सहायक तोंबर्लावार उपस्थित होते.
लोकमत सखीमंच आरमोरीच्या वतीने वैरागड मार्गावरील खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुका संयोजिका सुनिता तागवान, रंजीता राऊत, रोशनी बैस, रत्ना बोरकर, सुरेखा गोंदोळे, संगीता दुमाने, कल्याणी चंदेल, वैशाली दोडके, सायली पोफडी, मिनाक्षी गेडाम, मिना डिडरे, निता दुर्गे, लता बारसागडे, सिंधू कापकर, गौरी पटले, अनिता मोटघरे, रोडगे उपस्थित होत्या. वृक्षारोपण कार्यक्रमाला वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांचे सहकार्य लाभले.
घोट येथे वृक्षारोपण कार्यक्रमाला आलापल्लीचे उपवनसंरक्षक पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन करून वृक्षारोपण झाले. यावेळी जि.प. सदस्य संध्या दुधबळे, पं.स. सभापती मंदा दुधबावरे, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, लोकमत सखी मंचच्या संयोजिका आशा पेटकर, प्रतीक्षा पाटील, मुमताज सय्यद, अनिता नंदूरकर, अश्विनी वडेट्टीवार यांच्यासह नागरिक व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Spontaneous response to the tree plantation of members of the common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.