काेचीनारात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतीसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:55+5:302021-05-31T04:26:55+5:30
सर्वप्रथम सदस्य परदेशी दूधकवर यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेऊन सुरुवात केली. यानंतर सरपंच सुनीता मडावी, उपसरपंच रुपराम देवांगण, सदस्य ...
सर्वप्रथम सदस्य परदेशी दूधकवर यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेऊन सुरुवात केली. यानंतर सरपंच सुनीता मडावी, उपसरपंच रुपराम देवांगण, सदस्य टेमलाल देवांगण, योगिता डीलर, मीना कराडे, निराशा पुजेरी, पोलीस पाटील श्रावण घावडे, संगणक परिचालक गौतम जनबंधू, ग्रामपंचायत शिपाई लोमन सोनबरसा व चंद्रमणी सहारे, ग्राम रोजगार सेवक छबिलाल भेडी, अंगणवाडी सेविका सत्यफुला ढवगाये, अंगणवाडी मदतनीस अंबादे, जलसुरक्षक ओमकार सुवा, संगणक ऑपरेटर हसन कराळे, ग्रामसंघाचे सचिव कामेश्वरी देवांगण यांनी पुढाकार घेऊन लसीकरण घेतले. लसीकरण शिबिराला कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे, तहसीलदार छगनलाल भंडारी, नायब तहसीलदार बी. एन. नारनवरे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश फाये यांनी उपस्थित राहून भेट दिली.
परिचारिका राहाटे, रंगारी यांनी लसीकरणाचे महत्त्व व शंका कुशंकांचे निराकरण केले. लसीकरणाची भूमिका पार पाडली. यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतचे सचिव दामोदर पटले, तलाठी बैद्य व कोतवाल सरिता मडावी, ग्रामपंचायत कर्मचारी लोमन सोनबरसा, चंद्रमनी सहारे यांनी सहकार्य केले.