भाजपचे ध्येय धोरण घराघरात पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:57 PM2017-10-13T23:57:48+5:302017-10-13T23:58:13+5:30

भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने पारदर्शक व गतिमान प्रशासन दिले आहे. शिवाय विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्यान्वित केल्या आहेत.

Spread the BJP's mission policy in the house | भाजपचे ध्येय धोरण घराघरात पोहोचवा

भाजपचे ध्येय धोरण घराघरात पोहोचवा

Next
ठळक मुद्देएटापल्लीत बैठक : अशोक नेते यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने पारदर्शक व गतिमान प्रशासन दिले आहे. शिवाय विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्यान्वित केल्या आहेत. भाजप सरकारने केलेले काम जनतेपुढे मांडून एटापल्ली तालुक्याच्या प्रत्येक घराघरात भाजपचे ध्येयधोरण प्रभाविपणे पोहोचवा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी केले.
गुरूवारी एटापल्लीच्या शासकीय विश्रामगृहात भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अहेरी विधानसभा विस्तारक प्रकाश गेडाम, डॉ. भारत खटी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष नवीन बालाजी, विनोद अकनपल्लीवार, बाबुराव गम्पावार, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा महामंत्री जावेद अली आदी उपस्थित होते. याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी तालुक्यातील भाजपाच्या सर्व आघाड्यांचा आढावा घेतला. तालुका कार्यकारिणी बनविण्याच्या सूचना सर्व आघाडी प्रमुखांना दिल्या. पुढे बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, भाजप सरकार हे सर्वसामान्य गोरगरीबांसाठी काम करीत आहे. मागेल त्याला घरकूल, मागेल त्याला सिंचन विहीर, मागेल त्याला शेततळे या वैयक्तिक लाभाच्या योजनांसह मुद्रा लोण, सुकन्या, बेटी अचाओ, बेटी पढाओ आदी योजना गतिमानतेने राबवित आहे. शिवाय भाजप सरकारच्या काळात एटापल्ली तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत, असेही खा. नेते यावेळी म्हणाले. याप्रसंगी बाबुराव कोहळे यांनी भाजप पक्ष संघटनेबाबत मौलिक मार्गदर्शन केले. बैठकीला तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Spread the BJP's mission policy in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.