शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:56 PM2018-06-28T23:56:31+5:302018-06-28T23:57:12+5:30

राज्य व केंद्र सरकार गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना राबवीत असून, त्याचा फायदा लोकांना होत आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.

Spread the Government schemes to the citizens | शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा

Next
ठळक मुद्देभाजप जिल्हा कार्यसमितीची बैठक : पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य व केंद्र सरकार गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना राबवीत असून, त्याचा फायदा लोकांना होत आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.
स्थानिक पटेल मंगल कार्यालयात आयोजित भाजपच्या जिल्हा कार्यसमितीच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला पक्षाचे पूर्व विदर्भ संघटक डॉ.उपेंद्र कोठेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, अहेरी विधानसभाप्रमुख बाबूराव कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेव, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, महामंत्री डॉ. भारत खटी, महामंत्री सदानंद कुथे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ताराबाई कोटांगले, जिल्हा प्रभारी रेखा डोळस, स्वप्नील वरघंटे, नगरसेवक रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, जिल्हा परिषद सभापती माधुरी उरेते, जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, डी. के. मेश्राम, सिद्धीकी मंचावर उपस्थित होते.
अम्ब्रिशराव आत्राम पुढे म्हणाले, सरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या. कर्जमाफीमुळे शेतकºयांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. पदाधिकाºयांनी सरकारचे हे काम लोकांपर्यंत पोहचवावे, असे आवाहन आत्राम यांनी केले.
खा.अशोक नेते यांनी बैठकीला काही पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या विविध आघाड्याच्या पदाधिका?्यांच्या बैठका आयोजित करावयाच्या असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.जिल्ह्यात ९ नगरपंचायती भाजपच्या ताब्यात असून, २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा जिंकेल, असा विश्वास खा.नेते यांनी व्यक्त केला. पूर्व विदर्भ संघटक डॉ.उपेंद्र कोठेकर म्हणाले की, काँग्रेसने या देशात गरिबी आणली. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील गोरगरिबांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे. भाजप पदाधिकाºयांनी प्रत्येक बूथ मजबूत करुन पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: Spread the Government schemes to the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.