घरगुती भांडणातून एसआरपीएफ जवानाने केली सहकाऱ्याची हत्या

By दिलीप दहेलकर | Published: July 4, 2023 05:41 PM2023-07-04T17:41:21+5:302023-07-04T17:42:53+5:30

एसआरपीएफ कॅम्पमधील घटना :  आरोपी जवान अटकेत

SRPF jawan killed his colleague due to domestic quarrel | घरगुती भांडणातून एसआरपीएफ जवानाने केली सहकाऱ्याची हत्या

घरगुती भांडणातून एसआरपीएफ जवानाने केली सहकाऱ्याची हत्या

googlenewsNext

गडचिरोली : जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात तैनाती राहुन साेमवारला देसाईगंज तालुक्याच्या विसोरा नजीकच्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये सुट्टीवर परत आल्यावर शेजारी वास्तव्यास असलेल्या एसआरपीएफ जवानाशी ३ जुनच्या सायंकाळी घरगुती वादातून झालेल्या भांडणात एका जवानाने दुसऱ्या जवानास चाकुने भोसकले. दरम्यान गंभीर अवस्थेत जखमी जवानाला ब्रम्हपुरीच्या ख्रिस्तानंद दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तेथील डाॅक्टरांनी जखमीस मृत घोषित केल्याने एसआरपीएफ जवानांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुरेश मोतिलाल राठोड (३० वर्षे)असे मृतक जवानाचे नाव आहे. मारोती संभाजी सातपुते (३३ वर्षे) रा. एसआरपीएफ कॅम्प विसोरा असे हत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे.

मृतक एसआरपीएफ जवान हा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या पिपली बुर्गी पोलिस मदत केंद्रात कार्यरत राहुन नक्षल अभियान राबवित होता. ३ जुनला देसाईगंज शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या विसोरा नजीकच्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये कुटुंबिय वास्तव्यास असल्याने रजेवर आला होता. मृतक आणि आरोपी जवान दोघेही शेजारी राहात होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास घरगुती वादातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याने आरोपी मारोती सातपुते याने सुरेश राठोडला चाकुने भोसकून गंभीर जखमी केले.

दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत राठोड यास ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तेथील डाॅक्टरांनी राठोड यास मृतक घोषित केले. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

तीन दिवसाची पोलिस कोठडी

आरोपी जवान सातपुते याला अटक करून त्याचेवर भांदवीचे कलम ३०२अन्वये गुन्हा दाखल केला असुन देसाईगंज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या माग॔दश॔नात पोलिस उपनिरीक्षक युसूफ इनामदार, पोलिस हवालदार मोरेश्वर गौरकर करीत आहेत.

Web Title: SRPF jawan killed his colleague due to domestic quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.