एसआरपीएफच्या उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या, खिशात आढळली चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:48 PM2020-04-23T12:48:25+5:302020-04-23T14:36:53+5:30
एसआरपीएफची सदर तुकडी दोन महिन्यांंपासून सावरगाव येथे नक्षलविरोधी अभियानासाठी कर्तव्यावर आहे. पीएसआय शिंदे हे अनेक दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे कळते
धानोरा (गडचिरोली) : राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) गट 10 (पुणे) मधील पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री धानोेरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्रात घडली. चंद्रकांत शिंदे असे मृत उपनिरीक्षकाचे नाव आहे.
एसआरपीएफची सदर तुकडी दोन महिन्यांंपासून सावरगाव येथे नक्षलविरोधी अभियानासाठी कर्तव्यावर आहे. पीएसआय शिंदे हे अनेक दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे कळते. त्यांना मागील 6 ते 7 वर्षांपासुन पाठीच्या कण्याचा गंभीर त्रास होता. त्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात ड्युटी लागल्याने आणि सतत अभियानावर राहावे लागत असल्याने त्यांचा त्रास अधिक वाढला होता. या शारीरिक व्याधीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची चिठ्ठी त्यांच्या खिशात मिळाली. सावरगाव पोलिसांनी मार्ग दाखल केला असून तपास सुरू आहे. शिंदे यांचे पार्थिव पुणे जिल्ह्यातील त्यांच्या वाणेवाडी या मूळगावी नेऊन अंतिम संस्कार केले जाणार आहेत.