SSC Result 2019; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ५४.६५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 08:16 PM2019-06-08T20:16:30+5:302019-06-08T20:16:49+5:30
गडचिरोली जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला एकूण १४ हजार ९६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला एकूण १४ हजार ९६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ५४.६५ टक्के आहे. निकालाच्या बाबतीत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ५९.०७ टक्के तर मुलांचा निकाल ५०.५२ टक्के एवढा आहे. गडचिरोली येथील प्लॅटिनम जुबिली हायस्कूलची विद्यार्थिनी मयुरी रामटेके हिला ९४.४० टक्के गुण मिळाले असून ती जिल्ह्यातून प्रथम आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल घटला आहे.