‘एसटी’मुळे सर्वसामान्यांना दिलासा, पण गृह विलगिकरणाच्या अटीमुळे वांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:01:21+5:30

लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे.

‘ST’ brings relief to the common man, but Wanda due to the conditions of home separation | ‘एसटी’मुळे सर्वसामान्यांना दिलासा, पण गृह विलगिकरणाच्या अटीमुळे वांदा

‘एसटी’मुळे सर्वसामान्यांना दिलासा, पण गृह विलगिकरणाच्या अटीमुळे वांदा

Next
ठळक मुद्देआंतरजिल्हा वाहतूक : जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यावर द्यावे लागणार हमीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल पाच महिन्यानंतर सुरू झालेल्या एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतू दुसऱ्या जिल्ह्यातून बसने प्रवास करून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आता १४ दिवस विलगीकरण कक्षात राहणे सक्तीचे करणारा आदेश गुरूवारी (दि.२०) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. मात्र असे असले तरी बाहेर जिल्ह्यातील अडलेली कामे मार्गी लागणार असल्यामुळे अनेकांनी एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे. कोणत्या अटीशिवाय दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश जिल्ह्यात प्रवेश दिल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकते. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून एसटीने प्रवास करणाऱ्याला १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी काढली आहे.
अधिसूचनेत म्हटले आहे की, सध्यास्थितीत जवळपासच्या जिल्ह्यांमध्येच बसफेऱ्या सुरू कराव्यात. लांब पल्ल्याच्या बसेस पुढील आदेशापर्यंत सुरू करता येणार नाही. बसमध्ये केवळ २२ प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल.बसमध्ये सॅनिटायझर असणे आवश्क आहे. प्रवाशाने तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधल्याशिवाय बसमध्ये प्रवेश देऊ नये. प्रवाशाने आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांनी हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. हे हमीपत्र एसटी वाहकाकडे उपलब्ध राहणार आहेत. सदर हमीपत्र आरमोरी, देसाईगंज, पारडी, आष्टी, हरणघाट, कोरची या चेकपोस्टवर जमा केले जाईल. या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. तर रेडझोन व हॉटस्पॉट मधून येणाऱ्या प्रवाशाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल.
संबंधीत प्रवाशी खरच विलगीकरणात आहे काय याची खातरजमा तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे.

नागपूर व चंद्रपूरसाठी १६ फेऱ्या
आंतरजिल्हा वाहतूकीला गुरूवारपासून परवानगी दिल्यानंतर गडचिरोली आगारातून नागपूर व चंद्रपूरसाठी प्रत्येकी आठ फेºया सोडण्यात आल्या. मात्र पहिलाच दिवस असल्याने एसटीला पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशी मिळाले नाही. पहिला दिवस असल्याने नियोजन करताना एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झाली. तरीही चंद्रपूर, नागपूरसाठी बसफेऱ्या सोडण्यात आल्या. अहेरी आगारातून काही बसफेऱ्या चंद्रपूर व नागपूरसाठी सुटल्या.

विलगीकरणाच्या अटीचा बसणार फटका
दुसºया जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. याबाबतचे हमीपत्र व संबंधित प्रवाशाची माहिती जिल्ह्यावरील चेकपोस्टवर जमा केली जाणार आहे. एखाद्या नागरिकाला दुसऱ्या जिल्ह्यात काम असले तरी परत येताना त्याला गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे तो दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची हिंमत करणार नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकही गडचिरोली जिल्ह्यात येणार नाहीत. एकंदरीतच गृहविलगीकरणाच्या अटीमुळे एसटीला अपेक्षित प्रवासी मिळतील का, याबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहे.

Web Title: ‘ST’ brings relief to the common man, but Wanda due to the conditions of home separation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.