जिल्हाभरात एसटी बसची चाके मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:39+5:30

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना शासनामार्फत केल्या जात आहेत. शाळांना सुटी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अर्धेच कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. बाजारपेठा, आठवडी बाजार बंद केले आहेत.

ST bus wheels are dimmed throughout the district | जिल्हाभरात एसटी बसची चाके मंदावली

जिल्हाभरात एसटी बसची चाके मंदावली

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली; अनेक बसफेऱ्या कराव्या लागल्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणू प्रसाराच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने एसटीला प्रवाशी मिळणेही कठीन झाले आहे. त्यामुळे काही बसफेºया रद्द कराव्या लागत आहेत. तसेच भारमान कमी राहात असल्याने एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. दरम्यान रविवारी ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केल्याने बसफेऱ्या निश्चित नसून प्रवाशी उपलब्ध असतील तरच फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना शासनामार्फत केल्या जात आहेत. शाळांना सुटी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अर्धेच कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. बाजारपेठा, आठवडी बाजार बंद केले आहेत. तसेच मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले असल्याने त्या शहरांमध्ये नागरिक जाण्यास तयार नाही. या सर्व बाबींमुळे मागील पाच दिवसांपासून प्रवाशांची संख्या घटली आहे.
गडचिरोली आगारातून दर दिवशी ६८० बसफेऱ्या सोडल्या जातात. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने काही बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. शुक्रवारी दिवसभरात केवळ ३८ टक्के भारमान आले. यातून डिझेलचाही खर्च भरून निघाला नाही. त्यामुळे शनिवारी अनेक बसफेºया रद्द केल्या. ४४ आसनक्षमता असलेल्या एसटीत केवळ २० प्रवाशी बसविण्याचे निर्देश आहेत. त्यामुळेही प्रवाशांची संख्या घटली आहे.
प्रवाशांच्या गर्दीेने सदैव गजबजले राहणाऱ्या गडचिरोली येथील बसस्थानकात शनिवारी प्रवाशांची फारशी गर्दी दिसून आली नाही. ग्रामीण भागातीलच प्रवाशी बसस्थानकावर दिसून येत होते. नागपूर, यवतमाळ, अमरावती, पुणे यासारख्या शहरांमध्ये जाणारे प्रवाशी दिसून येत नव्हते.

आज ९० टक्के बसफेऱ्या रद्द होण्याची शक्यता
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी एसटीला प्रवाशी मिळणे कठीणच होणार असल्याने रविवारी एसटीच्या ९० टक्केपेक्षा अधिक बसफेऱ्या रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे एका सिटवर एकच प्रवासी बसवायचा आहे. या निर्देशाचे उल्लंघन करणाºया बसेसवर काही जिल्ह्यांमधील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जात आहे.

Web Title: ST bus wheels are dimmed throughout the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.