एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळताे, ना वैद्यकीय बिले मिळतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:31+5:302021-09-16T04:45:31+5:30
एवढेच नव्हे, तर सेवा बजावत असताना आजारपण किंवा अपघातावर झालेला वैद्यकीय खर्चाची बिलेही लवकर मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांनी दाखल केलेली ...
एवढेच नव्हे, तर सेवा बजावत असताना आजारपण किंवा अपघातावर झालेला वैद्यकीय खर्चाची बिलेही लवकर मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांनी दाखल केलेली वैद्यकीय बिले सहा ते आठ महिने मंजूरच होत नसल्याची माहिती आहे. एकीकडे पगार वेळेवर होत नसताना, उपचारांवर झालेला खर्च कूठून आणावा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडतो.
बाॅक्स
पगार दोन महिन्यातून एकदा
एसटीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कधीच वेळेवर पगार मिळत नाही. वेतन प्रधान अधिनियम १९३६ च्या तरतुदीनुसार महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन अदा करण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. दोन ते तीन महिने पगार अदा केले जात नाही. जुलै महिन्याचा पगार सप्टेंबर महिन्यात देण्यात आला.
बाॅक्स
सहा महिने झालेत वैद्यकीय बिले मिळेनात
कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न करणाऱ्या एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले काढण्यातही कमालीची दिरंगाई केले जाते. सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजारपणात केलेला खर्च महामंडळाकडून दिला जातो. यासाठी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. तथापी, प्रस्ताव सादर केल्यानंतरही बिल निघण्यासाठी महिनोगणती वाट पहावी लागते. सहा ते आठ महिने उलटूनही बिल निघतच नाही. कधी कधी वर्ष उलटून गेल्यानंतरही बिल मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे
काेट
उपचारावर झालेला खर्च आणावा कोठून?
इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचे पगार कधीच वेळेवर होत नाहीत. दोन महिन्यातून एकदा पगार घ्यावा लागतो, अशी स्थिती आहे. वैद्यकीय बिलेही लवकर काढली जात नाहीत. अनेकदा तर ही बिले मिळतही नाहीत.
वैद्यकीय बिलासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतरही तो मंजूर होईलच याची शाश्वती नसते. यामध्येही अनेक अटी, शर्ती आहेत. आजारपणावर केलेला खर्च महामंडळाकडून मिळावा अशी अपेक्षा असते, परंतु अनेकदा उपेक्षाच पदरी पडते.
एक एसटी कर्मचारी
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
एकूण आगार-२
वाहक -२७४
चालक -३३६
अधिकारी- १७
कर्मचारी -६५