एसटीला मिळाले ४८ ‘चालक कम वाहक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:24+5:30
गडचिरोली विभागाअंतर्गत गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी हे तीन आगार आहेत. या तीनही आगारांमध्ये वाहक व चालकांची सुमारे २१३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत होता. काही कर्मचाºयांना ओव्हर टाईम काम करण्याची जबाबदारी पेलावी लागत होती. तर कधी-कधी वाहक व चालकांअभावी बसफेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. दोन महिन्यांपूर्वी गडचिरोली विभागाने ६१ चालक कम वाहकांची नियुक्ती केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एसटी महामंडळाकडून ४८ दिवसांचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४८ ‘चालक कम वाहक’ यांना गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आगारात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांअभावी बसफेऱ्या रद्द होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली विभागाअंतर्गत गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी हे तीन आगार आहेत. या तीनही आगारांमध्ये वाहक व चालकांची सुमारे २१३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत होता. काही कर्मचाºयांना ओव्हर टाईम काम करण्याची जबाबदारी पेलावी लागत होती. तर कधी-कधी वाहक व चालकांअभावी बसफेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. दोन महिन्यांपूर्वी गडचिरोली विभागाने ६१ चालक कम वाहकांची नियुक्ती केली होती. तीन वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना ४८ दिवसांचे तर तीन वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेल्यांना ८० दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ४८ दिवसांच्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना आगारांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. गडचिरोली आगाराला २१, अहेरी आगाराला १९ तर ब्रह्मपुरी आगाराला ८ चालक कम वाहकांची नियुक्ती देण्यात आली आहे.
नव्याने रूजू होणाºया चालक कम वाहकांना वाहन चालविण्याबरोबरच वाहकाचे काम कसे करावे, याबाबतचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याचा उपयोग गरजेनुसार करता येणार आहे. वाहकाची आवश्यकता असेल तर वाहक म्हणून नियुक्ती दिली जाईल. चालकाची आवश्यकता असेल तर चालक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे.
गडचिरोली आगारात एकूण १११ बसेस आहेत. १८१ चालक व १८९ वाहक आहेत. बसफेऱ्यांच्या तुलनेत चालक व वाहकांची संख्या कमी असल्याने अनेकवेळा बसफेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. गडचिरोली आगाराला नवीन २१ चालक कम वाहक मिळाल्याने थोडीफार समस्या दूर होणार आहे.
गडचिरोली आगारात दोन नवीन बसेस दाखल
गडचिरोली आगाराला मागील महिन्यात दोन नवीन बसेस मिळाल्या होत्या. त्यानंतर आता जानेवारी महिन्यात पुन्हा दोन नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. सदर बसेस विठाई या नावाच्या आहेत. या बसेसची आसन क्षमता ४४ सिटर एवढी आहे. डीएस प्रकारचे इंजिन, एमएस बॉडी आहे. आरमदायक सिटा आहेत. साध्या तिकीट दराने या बसेस चालविल्या जाणार आहेत. गडचिरोली-उमरखेड या लांब पल्ल्यावर या बसेस सोडल्या जातील.