एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; गडचिरोलीत वाहतूकसेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:30 PM2018-06-08T12:30:32+5:302018-06-08T12:30:39+5:30
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात पुकारलेल्या संपाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अहेरी आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळपासून बेमुदत बंद घोषित केल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.
Next
ठळक मुद्देप्रवाशांचे हालविद्यार्थ्यांसमोर प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क:
गडचिरोली: एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात पुकारलेल्या संपाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अहेरी आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळपासून बेमुदत बंद घोषित केल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. या आगारातून बाहेर गेलेल्या गाड्याच तेवढ्या परत येत असून या आगारातून आतापर्यंत एकही बस गाडी सोडण्यात आलेली नाही. याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. दुपारी १२ वाजेपर्यंतच्या ४५ गाड्यांच्या शेड्यूलपैकी फक्त १ गाडी बाहेर पडली आहे. या संपामुळे विद्यार्थी, पालक, महिला सर्वजण बसच्या प्रतिक्षेत ठिकठिकाणी तिष्ठत आहेत.