खासगी प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटीचा प्रवास सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:10+5:302021-02-05T08:55:10+5:30
गडचिराेली हे जिल्हास्तरावरील आगार असल्याने या आगारातून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये लांब पल्ल्याच्या बसेस साेडल्या जातात. तसेच दुसऱ्या आगाराच्या अनेक बसेस ...
गडचिराेली हे जिल्हास्तरावरील आगार असल्याने या आगारातून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये लांब पल्ल्याच्या बसेस साेडल्या जातात. तसेच दुसऱ्या आगाराच्या अनेक बसेस गडचिराेली आगारात दाखल हाेतात. वेग मर्यादा हे अपघात कमी करण्याचे प्रभावी माध्यम आहे. एसटीमार्फत वेग मर्यादेचे पालन केले जाते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी हाेण्यास मदत हाेत आहे. दुसरीकडे खासगी प्रवासी वाहने प्रचंड वेगाने चालविली जातात. त्यामुळे या वाहनांचे अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळेच लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवासी एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. इच्छितस्थळी पाेहाेचण्यास थाेडाफार उशीर हाेत असला तरी सुरक्षित प्रवासाचा विश्वास नागरिकांना आहे.
बाॅक्स
६५ वर स्पीड लाॅक
प्रवाशांची सुरक्षितता हा एसटीचा महत्त्वाचा उद्देश आहे. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक एसटी वाहनाचे ६५ किमी प्रती तास वेगावर स्पीड लाॅक केले जाते. त्यामुळे ते वाहन ६५ किमी प्रती तासपेक्षा अधिक वेगाने धावू शकत नाही. जेवढा वेग कमी, तेवढे अपघात हाेण्याचे प्रमाण कमी राहते. त्यामुळेच गडचिराेली आगारातील बसचे अपघातांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे.
काेट
प्रत्येक वाहनचालकाला एसटीच्या अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक त्या सूचना केल्या जातात. या सूचनांचे पालन वाहनचालक करतात. अपघात झाल्यास त्याची भरपाई वाहनचालकाकडूनच वसूल केली जाते. त्यामुळे बहुतांश वाहनचालक अपघात हाेणार नाही, या दृष्टीने प्रयत्नशील राहतात. त्यामुळे एसटीला अपघात टाळणे शक्य झाले आहे. वर्षभरात केवळ नऊ किरकाेळ अपघात झाले आहेत.
- मंगेश पांडे, आगार प्रमुख गडचिराेली
एकूण बसेस १०३
वाहनचालक २०७
मागील वर्षात झालेले एसटीचे अपघात
जानेवारी १
फेब्रुवारी ४
मार्च ०
एप्रिल ०
मे १
जून ०
जुलै ०
ऑगस्ट ०
सप्टेंबर ०
ऑक्टाेबर २
नाेव्हेंबर ०
डिसेंबर १
एकूण ९