बिबट्याच्या भीतीमुळे कर्मचारी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:43 AM2021-09-24T04:43:22+5:302021-09-24T04:43:22+5:30
नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली असल्यामुळे वनविभागाने वरील सर्व मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेले झुडपे ताेडण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी ...
नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली असल्यामुळे वनविभागाने वरील सर्व मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेले झुडपे ताेडण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील शाळेचे शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, नर्सेस, आरोग्य कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी असे बरेच कर्मचारी आष्टी येथे राहतात. आष्टी येथून आलापल्ली, अहेरी, महागाव, लगाम, अडपल्ली, सुभाषग्राम, कोपरअली, मुलचेरा, कोनसरी, कढोली, येणापूर आदी गावाला हे कर्मचारी दुचाकीने जाणे-येणे करतात. मात्र आता बिबट्याने एका मुलाला ठार केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
या बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन ही दिले मात्र त्यावर वनविभागाकडून अजूनपर्यंत कोणतीच कारवाही झाली नाही. काही दिवसांपूर्वी आष्टी ते आलापल्ली मार्गावरील रस्त्यालगत झुडपे ताेडण्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर उपविभागीय वनाधिकारी, वन्यजीव आलापल्ली यांनी वन कर्मचाऱ्यांना झुडपे ताेडण्यास मनाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.