ग्रामीण डाकसेवक संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:56 PM2018-06-04T22:56:32+5:302018-06-04T22:56:42+5:30

ग्रामीण भागातील डाकसेवकांना अत्यंत कमी वेतन दिले जात असून अधिक तास काम करावे लागते. या अन्यायाच्या निषेधार्थ ग्रामीण डाक कर्मचाºयांनी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे.

Stampede on the Rural Mail Service | ग्रामीण डाकसेवक संपावर

ग्रामीण डाकसेवक संपावर

Next
ठळक मुद्देसेवा कोलमडली : वैरागड येथे डाक कर्मचाऱ्यांची शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ग्रामीण भागातील डाकसेवकांना अत्यंत कमी वेतन दिले जात असून अधिक तास काम करावे लागते. या अन्यायाच्या निषेधार्थ ग्रामीण डाक कर्मचाºयांनी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. दरम्यान वैरागड येथील डाक कर्मचाºयांनी कार्यालयासमोर शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली.
अलिकडे डाकसेवकांवर पोष्टाच्या आर्थिक बचतीचा भार वाढला आहे. डाकसेवकाच्या वेतनात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे डाकसेवेतील कर्मचारी वेतनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण डाक कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, डॉ. कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, निवृत्ती वेतन देण्यात यावे, डाकसेवकांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा देण्यात यावा, आदी मागण्या डाकसेवकांनी केल्या आहेत.
सदर निदर्शनेदरम्यान वैरागडच्या उपडाक कार्यालयातील डाकसेवक व्ही.आर. हाडगे, एम.एम. कुमरे, कुळसंगे, वाय.वाय. पित्तुलवार, मेश्राम, गावतुरे, एस.डी. चित्रीव, जनबंधू, तनूजा दखणे, आखाडे, एस.जी. वझे आदी उपस्थित होते.
या कर्मचाºयांनी शासनाच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली. डाकसेवकांच्या संपामुळे ग्रामीण भागातील महत्त्वाची पत्रे, नोकरीचे आदेश, पार्सल, प्रशासकीय कागदपत्राचा ढीग पडला आहे. आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरासारखी गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डाकसेवेची स्थिती झाली आहे. कर्मचाºयांच्या संपामुळे नागरिकांना महत्त्वाचे पार्सल तसेच दस्तावेज प्राप्त होण्यास प्रचंड विलंब होत आहे. आजही डाकसेवेला महत्त्वपूर्ण स्थान आहे. मात्र केंद्र शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे डाकसेवेवर गेल्या काही वर्षांपासून अवकळा आली आहे.

Web Title: Stampede on the Rural Mail Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.