पाेलीस उंचावणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 05:00 AM2021-09-24T05:00:00+5:302021-09-24T05:00:41+5:30

शेतकऱ्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बामणी पोलीस स्टेशनच्या परिसरात १५ हजार पपई रोपांची रोपवाटिका तयार करण्यात आली. दि.२२ ला बामणी येथे पपई लागवड प्रशिक्षण व रोपे वाटप मेळावा पार पाडण्यात आला. सुरुवातीला पोलीस अधीक्षक गोयल यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक मदन मस्के (प्रभारी अधिकारी, बामणी) यांनी लिहिलेल्या पपई लागवड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

The standard of living of the farmers in the district will be raised | पाेलीस उंचावणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान

पाेलीस उंचावणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
बामणी : आदिवासीबहुल जिल्ह्यातील नागरिकांना परंपरागत धान लागवडीसोबत फळबाग लागवडीचा नवीन मार्ग दाखवत त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जात आहे. पोलिसांच्या दादालोरा खिडकीच्या कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना पपईसह इतर फळझाडांची १५ हजार रोपे पोलिसांनी वाटप केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
शेतकऱ्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बामणी पोलीस स्टेशनच्या परिसरात १५ हजार पपई रोपांची रोपवाटिका तयार करण्यात आली. दि.२२ ला बामणी येथे पपई लागवड प्रशिक्षण व रोपे वाटप मेळावा पार पाडण्यात आला.
सुरुवातीला पोलीस अधीक्षक गोयल यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक मदन मस्के (प्रभारी अधिकारी, बामणी) यांनी लिहिलेल्या पपई लागवड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडीअडचणी समजून घेऊन कृषी विभागाच्या विविध योजना व कृषी तंत्रज्ञान तसेच पपई लागवडीबाबत तालुका कृषी अधिकारी सिरोंचा मदन मेश्राम पं.स. सिरोंचाचे कृषी अधिकारी एस.डी.  कोपनार  यांनी  मार्गदर्शन  केले.
यावेळी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० पपई रोपे, गांडूळ खत व पपई लागवडीबाबतच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. १० महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा राहुल गायकवाड, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, प्रगतिशील शेतकरी रवी कारसपल्ली, उपपोस्टे ब्रामणीचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच अहेरी, जिमलगट्टा उपविभागातील २०० ते २५० शेतकरी उपस्थित होते. पाेलिसांच्या या उपक्रमाचे त्यांनी काैतूक केले.
कार्यक्रमासाठी उपपोस्टे बामणीचे प्रभारी अधिकारी सपोनि मदन मस्के, पो.उपनिरीक्षक दीपक पारधे, संभाजी मुंडे, उदय पाटील व अंमलदार आदींनी सहकार्य केले.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी  विविध ठाण्यांचा पुढाकार
- शेती हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता आर्थिक उत्पन्नवाढीचा स्रोत बनावी यासाठी शेतकरी बांधवांना नवीन पीक पद्धतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, तसेच रोपे वाटप करून कृषीविषयक जागृती आणण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. यापूर्वी कृषी समृद्धी योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर पेरमिली पो.स्टे.मार्फत जिल्हाभरातील होतकरू व गरजू शेतकऱ्यांना १५ हजार शेवगा रोपे वाटप करण्यात आली होती. राजाराम (खां.) पोलिसांच्या वतीने १५ हजार सीताफळ रोपांची रोप वाटिका तयार केली असून ती रोपेही शेतकऱ्यांना लागवडीकरिता वाटप केली जाणार आहेत, असे यावेळी पो. अधीक्षक अंकित गोयल म्हणाले.

 

Web Title: The standard of living of the farmers in the district will be raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.