अनखाेडात कापूस खरेदीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:57 AM2021-01-08T05:57:14+5:302021-01-08T05:57:14+5:30

चामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यातील अनखाेडा येथील आस्था जिनिंग ॲन्ड प्रेसिंग इंडस्ट्रीजमध्ये शासनाच्या आधारभूत किंमत याेजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस ...

Start buying cotton in Ankheda | अनखाेडात कापूस खरेदीस प्रारंभ

अनखाेडात कापूस खरेदीस प्रारंभ

Next

चामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यातील अनखाेडा येथील आस्था जिनिंग ॲन्ड प्रेसिंग इंडस्ट्रीजमध्ये शासनाच्या आधारभूत किंमत याेजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ विभागीय कार्यालय वणी यांच्यामार्फत २८ डिसेंबरपासून कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे. चामाेर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी कापूस खरेदी केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. शासनाच्या आधारभूत कापसाचा दर लांब धाग्याचा ५ हजार ८२५ रुपये व मध्यम धागा कापूस ५ हजार ५१५ रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी केला जात आहे. खासगी व्यापारी साडेचार हजार ते ४ हजार ८०० रुपये भाव देत असल्याची माहिती आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या आधारभूत कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा. ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी चामाेर्शी बाजार समितीकडे नावाची नाेंदणी केली आहे त्यांना बाजार समितीकडून फाेनद्वारे कळविण्यात येईल, असे गण्यारपवार यांनी म्हटले आहे.

भेटीदरम्यान कापूस महासंघाचे प्र-व्यवस्थापक आटे, ग्रेडर डाेईजड, बाजार समितीचे सचिव निलेश पिंपळकर, सांख्यिकी प्रकाश शिवणीवार, लिपिक विजय शेंडे, मनाेहर बाेधनवार, राजू बाेधनवार आदी उपस्थित हाेते.

===Photopath===

040121\04gad_1_04012021_30.jpg

===Caption===

कापूस खरेदी केंद्राची पाहणी करताना कृउबासचे सभापती अतुल गण्यारपवार व अन्य.

Web Title: Start buying cotton in Ankheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.