गोडाउनमधील धानाची उचल करून नवीन धान खरेदी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:48 AM2021-02-27T04:48:47+5:302021-02-27T04:48:47+5:30
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी करण्यात आलेल्या धानाची वखार महामंडळाच्या गोडाउनमध्ये साठवणूक करण्यात आली असून, त्यांची अद्यापही विल्हेवाट ...
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी करण्यात आलेल्या धानाची वखार महामंडळाच्या गोडाउनमध्ये साठवणूक करण्यात आली असून, त्यांची अद्यापही विल्हेवाट न लावल्यामुळे नव्याने खरेदी करण्यात आलेल्या धानाची साठवणूक करण्यात अडचणी येत आहेत. धान खरेदी बंद झालेली आहे. तरी जुन्या धानाची त्वरित उचल करून नवीन धान खरेदीचा मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्या जाते; पण सदर धान साठवण्यासाठी पुरेसे गोडाउन उपलब्ध नसल्याने धान साठवण्याअभावी महामंडळाने खरेदी केलेले धान उघड्या जागेवर ठेवावे लागतात आणि पाणी, पाऊस तसेच मोकाट जनावरे, उंदीर इत्यादीमुळे त्याची नासाडी होण्याचे प्रमाण मागील अनेक वर्षांपासून वाढले आहे.
धानाची उचल न केल्यामुळे नव्याने खरेदी केलेले धान साठवण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी वरील धान खरेदीवरसुद्धा मर्यादा आल्या आहेत व शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.
या सर्व अडचणींचा विचार करून गोडाउनमधील धान्याची त्वरित उचल करावी, तसेच नवीन गोडाउन बांधण्यात यावे व धान खरेदी करून त्याची नासाडी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खंडारे, सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, अशोक खोब्रागडे, हेमंत सहार, निता सहारे, ज्योती उंदिरवाडे, नरेंद्र रायपुरे, वनिता गेडाम, वनमाला झाडे व शहर अध्यक्ष महिला आघाडी प्रल्हाद रायपुरे, पुजाराम जांभुळकर आदींनी केली आहे.