गडचिरोली-येनापूर-जैरामपूर बससेवा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:23+5:302021-08-23T04:39:23+5:30
कोविड-१९च्या कालावधीत वाढता संसर्ग लक्षात घेत ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आल्या. संसर्ग कमी झाल्यावर काही दिवसांनंतर शासनाचे नियम ...
कोविड-१९च्या कालावधीत वाढता संसर्ग लक्षात घेत ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आल्या. संसर्ग कमी झाल्यावर काही दिवसांनंतर शासनाचे नियम पाळून काही मोजक्या बससेवा सुरू करण्यात आल्या; परंतु महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक असलेल्या मार्गांवर अद्यापही बससेवा सुरू करण्यात आल्या नाही. येनापूर परिसरात जवळपास २० ते २५ गावांचा समावेश आहे. येनापूरवरून जैरामपूर येथे जाण्यासाठी आधी बससेवा सुरू होती. आता ही बंदच असल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही ठिकाणी शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी शाळेत जण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करीत आहेत. परिणामी आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शासकीय कामाकरिता चामोर्शी, गडचिरोली येथे जाण्यासाठी पर्याय नाही. या बाबीची दखल घेऊन गडचिरोली-येनापूर-जैरामपूर ही बस सुरू करावी, अशी मागणी संदीप तिमाडे यांनी केली आहे.