धान खरेदी व साठवणूक केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:35 AM2021-03-19T04:35:27+5:302021-03-19T04:35:27+5:30
मार्कंडादेव येथील धर्मशाळेच्या चाळीत व ग्रामपंचायतीच्या सभागृहात तसेच भेंडाळा येथे येगोलपवार यांच्या खाजगी गाेदामामध्ये धान खरेदी केंद्र व साठवणूक ...
मार्कंडादेव येथील धर्मशाळेच्या चाळीत व ग्रामपंचायतीच्या सभागृहात तसेच भेंडाळा येथे येगोलपवार यांच्या खाजगी गाेदामामध्ये धान खरेदी केंद्र व साठवणूक केंद्र सुरू झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांसाठी साेयीचे हाेऊ शकते. आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने संथ गतीने धानाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची धान खरेदी अजूनही झाली नाही. अनेक शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. चामोर्शी तालुक्यातील धान साठवणुकीचे गाेदाम पूर्ण भरल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास प्रशासन नकार देत आहे. त्यामुळे मार्कंडा देवस्थानातील धर्मशाळेच्या चाळींमध्ये धान खरेदी केंद्र सुरू करून ग्रामपंचायतीच्या सभागृहात साठवणुकीचे केंद्र निर्माण करावे तसेच भेंडाळा येथे येगोलपवार यांच्या खाजगी गोडाऊनमध्ये खरेदी केंद्र व साठवणूक केंद्र सुरू करावे, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी शासनाकडे केली आहे.
यावेळी संजय खेडेकर, राजू मोगरे, राजू शेंडे, घनश्याम वासेकर, रत्नाकर शेंडे, राजू वासेकर, चेतन मोगरे, संगीता मोगरे, पुनाजी भाकरे, काशिनाथ चुधरी, नेताजी कुथे, गजानन सातपुते, एकनाथ कुनघाडकर, रवी सातपुते, चंद्रया येगोलपवार, हेमंत सातपुते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.