जाेगीसाखरा येथे हमीभाव केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:04+5:302021-04-29T04:28:04+5:30
जाेगीसाखरा परिसरातील पळसगाव, पाथरगोटा, शंकरनगर, सालमारा, कनेरी, रामपूर, आष्टा, कासवी, अंतरजी जोगी साखरा या दहा गावात मोठ्या प्रमाणात ...
जाेगीसाखरा
परिसरातील पळसगाव, पाथरगोटा, शंकरनगर, सालमारा, कनेरी, रामपूर, आष्टा, कासवी, अंतरजी जोगी साखरा या दहा गावात मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहेत. तसेच उन्हाळ्यामध्ये मका उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून गेल्या तीन-चार वर्षांपासून फायदेशीर उत्पादन म्हणून मका उत्पादनाकडे विशेष लक्ष देऊन परिसरातील सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी मका उत्पादन घेत आहेत. मात्र स्थानिक ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्री संदर्भात कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना मका व धान्य व्यापाऱ्यांना बेभाव किमतीत विकावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या मोठ्या कष्टातून एका एकरामध्ये १५ क्विंटल मका उत्पादन होते. एवढा माल घरी ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी गावात आलेल्या व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने माल विकून मोकळे व्हावे लागत आहे. जोगीसाखरा येथे कृषी गोडाऊन व हमीभाव केंद्र स्थापन केल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल मालाची व्यवस्था होईल.