देसाईगंज येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:35 AM2021-05-24T04:35:23+5:302021-05-24T04:35:23+5:30
माेटवाणी यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम ...
माेटवाणी यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तसेच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विकासापासून कोसो दूर आहे. जिल्ह्यात भौतिक सुविधा नसल्याने नागरिकांचा विकास शकत नाही. गरीब, शेतकरी, शेतमजुरांना आरोग्याच्या सोयी व सवलतींचा लाभ मिळत नसल्याने अनेकदा आजारांना बळी पडावे लागते.
जिल्ह्यात गडचिरोली किंवा देसाईगंज येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले तर जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सुटून जीवितहानी टळू शकते. शिवाय देसाईगंज येथे मोठी बाजारपेठ आहे. भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पशुसंवर्धन विभागाची ८०० एकर जमीन असून मोठमोठी सभागृहे बांधलेली आहेत. त्यामुळे देसाईगंज येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास काहीच हरकत नाही. येथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास इतर जिल्ह्यांतील रुग्णांसाठी फायद्याचे हाेईल. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन वैद्यकीय महाविद्यालय देसाईगंज किंवा गडचिरोली येथे सुरू करावे, अशी मागणी जेसा मोटवाणी यांनी केली आहे.