आरमोरी, वैरागडात धान खरेदी केंद्र सुरू करा
By admin | Published: November 1, 2015 02:03 AM2015-11-01T02:03:12+5:302015-11-01T02:03:12+5:30
तालुका मुख्यालयात आरमोरी व तालुक्यातील वैरागड येथे धान खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना अल्प दरात द्यावा लागतो.
केंद्राअभावी अडचण : माल खासगी व्यापाऱ्यांना
वैरागड : तालुका मुख्यालयात आरमोरी व तालुक्यातील वैरागड येथे धान खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना अल्प दरात द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दोन्ही ठिकाणी आदिवासी विकास महामंडळ किंवा खरेदी विक्री संस्थेमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
खरीप हंगामातील धान पीक शेतकरी गरजेपोटी अत्यल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना विकतात. आरमोरी, वैरागड येथे धान खरेदी केंद्र सुरू झाल्यास या भागातील शेतकऱ्यांसाठी धान्य विकणे सोयीचे होईल.
मातीमोल भावात खासगी व्यापाऱ्याना विकले जाणारे धान्य बंद होईल. यात शेतकऱ्यांचाच फायदा आहे. त्यामुळे आरमोरी व वैरागड येथे आदिवासी विकास महामंडळ किंवा खरेदी विक्री संस्थेच्या मार्फतीने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)