आष्टी येथील पेपर मिल सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:32 AM2021-01-21T04:32:56+5:302021-01-21T04:32:56+5:30
आष्टी : गडचिराेली जिल्ह्यातील बीजीपीपीएल तथा अवंता हाेल्डिंग युनिट आष्टी येथील बंद पेपर मिल व पेपर बॅगचे उत्पादन पूर्ववत ...
आष्टी : गडचिराेली जिल्ह्यातील बीजीपीपीएल तथा अवंता हाेल्डिंग युनिट आष्टी येथील बंद पेपर मिल व पेपर बॅगचे उत्पादन पूर्ववत सुरू करावे, तसेच कामगारांचे थकीत वेतन द्यावे, अशी मागणी गडचिराेली जिल्हा पेपर मिल कामगार संघाने आमदार तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आष्टी येथील युनिटमधील कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. संघटनेच्या वतीने पेपर मिल व्यवस्थापन, शासन तसेच प्रशासनासाेबत अनेकवेळा बैठका घेण्यात आल्या; परंतु ताेडगा निघाला नाही. त्यामुळे कामगारांना मानसिक त्रासासह आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जून २०१६ पासून बंद असलेली पेपर मिल सुरू करावी. ३० सप्टेंबर २०१७ राेजी त्रिवार्षिक कराराची मुदत संपली आहे. नवीन करार १ ऑक्टाेबर २०१७ ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत झाला नाही. ताे लवकर करण्यात यावा, कामगारांचे थकीत वेतन द्यावे, मेडिकल व एलटीओची रक्कम द्यावी, २५ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना राेजगार न देता नवीन कामगारांना राेजगार दिला जात आहे. त्यामुळे जुन्या कामगारांवर अन्याय हाेत आहे. नवीन कामगारांना राेजगार देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना आ. डाॅ. देवराव हाेळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित हाेते.