धानाची उचल करून उन्हाळी खरेदी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:39 AM2021-05-11T04:39:07+5:302021-05-11T04:39:07+5:30
अहेरी : महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाची उचल करून उन्हाळी ...
अहेरी : महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाची उचल करून उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उन्हाळी धान पीक निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीच नाेंदणी केली. परंतु, अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहे. खरीप हंगामात खरेदी केलेला धान अद्यापही गाेदामात पडून आहे. जाेपर्यंत हा माल उचलला जाणार नाही, ताेपर्यंत नवीन खरेदी शक्य नाही. काही दिवसांतच खरीप हंगामाला सुरुवात हाेईल. जिल्ह्यात बहुसंख्य शेतकरी उन्हाळी धान पीक घेतात. सध्या धान पीक निघण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, धान खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे निवेदनातून केली आहे.