अतिक्रमण हटविलेल्या थोरात व देसाई चौकाचे काम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:42 AM2021-09-23T04:42:03+5:302021-09-23T04:42:03+5:30
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी बाबूराव थोरात व शहरांची निर्मिती ज्या महान विभूतीने केली, त्यांचे नाव देऊन देसाईगंज हे शहर आजमितीस नावारूपास ...
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी बाबूराव थोरात व शहरांची निर्मिती ज्या महान विभूतीने केली, त्यांचे नाव देऊन देसाईगंज हे शहर आजमितीस नावारूपास आलेले आहे. या संपूर्ण चौकाला अतिक्रमणांचा घट्ट विळखा पडलेला होता. ‘लोकमत’ने याबाबत वारंवार पाठपुरावा केला. अखेर पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत, २० जुलैला हे अतिक्रमण हटविले. त्या ठिकाणी दोन्ही विभूतींच्या नावाचे फलक दर्शनी भागात लावून चौकाची जागा मोकळी केली. लागलीच दुसऱ्या दिवसापासून या चौकाच्या सपाटीकरणापासून, तर काॅलम उभारण्यासाठी देसाई स्तंभाच्या तिन्ही बाजूला जेसीबीच्या साहाय्याने सहा ते सात फुटाचे खोल खड्डेही खाेदण्यात आले. त्यातच दोन्ही चौकांसाठीचे बांधकाम साहित्यही मोक्याच्या ठिकाणी आणून ठेवण्यात आले.
सुरुवातीला कामाची जशी गती दाखविण्यात आली, त्यानुसार या चौकांचे काम लवकरच पूर्णत्वास येईल, अशी नागरिकांनी आशा व्यक्त केली होती. परंतु अचानक कामाची गती मंदावली. परिसरातील या चौकात फक्त बांधकाम साहित्य पडून असून व जेसीबीने खोदलेल्या खड्ड्यांच्या मुरूमाचे ढीग दिसत आहेत. त्यातच हा चौक बाजार चौकात प्रवेश करतानाचा प्रवेशाचा मार्ग आहे. खड्डे खोदून ठेवलेल्या भागात अगदी एक ते दीड फुटावर सात ते सहा फुटाचे खोल खड्डे खोदण्यात आलेले जसेच्या तसेच आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेला व प्रतिष्ठानात कोणत्याही कामासाठी जात- येत असताना या खड्ड्यात पडून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहराचे सौंदर्य वाढविणाऱ्या या दोन्ही चौकांचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
220921\img_20210901_180242.jpg
देसाईस्तंभ चौकाच्या बांधकामासाठी प्रतिष्ठानाच्या लगत असे जेसीबीने खोदून ठेवण्यात आलेले खड्डे जिवित हानी होण्याची शक्यता.