आठवडाभरात कामे सुरू करा अन्यथा नवीन निविदा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:28+5:302021-02-14T04:34:28+5:30

चामाेर्शी : चामोर्शी नगरपंचायत क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे प्रलंबित आहेत. ही कामे पुढील सात दिवसांत सुरू ...

Start work within a week or else issue a new tender | आठवडाभरात कामे सुरू करा अन्यथा नवीन निविदा काढा

आठवडाभरात कामे सुरू करा अन्यथा नवीन निविदा काढा

Next

चामाेर्शी : चामोर्शी नगरपंचायत क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे प्रलंबित आहेत. ही कामे पुढील सात दिवसांत सुरू करण्यात यावे, अन्यथा नव्याने निविदाप्रकिया राबवून कामे तातडीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

चामाेर्शी नगरपंचायतीत आढावा बैठक दि. १२ फेब्रुवारीला पार पडली. यावेळी नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, न. पं. मुख्याधिकारी सतीश चौधरी, भूमिअभिलेखचे वासुदेव झिलपे, दुय्यम निबंधक दयाराम चित्सकर यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे उपस्थित होते. चामोर्शीनगरातील मालमत्ता कर व पाणीकराची एकूण मागणी लक्षात घेता असलेली वसुली अत्यल्प असून, ३१ मार्चपर्यंत वसुली करून त्या निधीचा उपयोग शहराच्या विकासासाठी करावा, असे निर्देशही दिले. नगरपंचायत अंतर्गत असणारी रिक्त पदे शासनाकडून भरण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार. नगरपंचायत डी. पी. प्लॅन संबंधित ठेकेदाराच्या यंत्रणेने काम न केल्याने प्रलंबित आहे. त्यामुळे पुढील एका महिन्याच्या आत ते काम करावे, असे निर्देश हाेळी यांनी दिले. सिटी सर्वे नगरपंचायत क्षेत्रात लवकर सुरू करावा. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २३४ प्रस्ताव म्हाडाकडे प्रस्तावित असून त्यास अजूनपर्यंत मंजुरी न मिळाल्याने आ. डॉ. देवराव होळी यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर दहन दफनभूमी कामांचे अंदाजपत्रक लवकर तयार करून पुढील कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. बैठकीला नगरपंचायतमधील अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

बाॅक्स

निधी मिळूनही कामे प्रलंबित

चामोर्शीनगराच्या विकासासाठी नगरोत्थान अभियानांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून २०१९-२० करिता १ कोटी २३ लाख,२०२०-२१ करिता ८९ लाख ४० हजार, नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१९-२०करिता २ कोटी ३२ लाख,२०२०-२१ करिता २ कोटी ११ लाख, नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१९-२० करिता १ कोटी १४ लाख, २०२०-२१ करिता १ कोटी ४० लाख, अग्निशमन सेवा व बळकटीकरण योजनेअंतर्गत २०१९-२० करिता ८९ लाख, रस्ते अनुदान अंतर्गत २०१९-२० मध्ये २० लाख, नवीन नगरपंचायत अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊन सुद्धा अजूनपर्यंत कामे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Web Title: Start work within a week or else issue a new tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.