कुरखेडात अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका
By admin | Published: May 20, 2014 11:37 PM2014-05-20T23:37:27+5:302014-05-20T23:37:27+5:30
स्थानिक उपजिल्हा रूग्णालयाला राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून याचा लाभ कुरखेडा व
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रूग्णालयाला राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून याचा लाभ कुरखेडा व कोरची तालुक्यातील रूग्णांना मिळणार आहे. जिल्ह्याच्या उत्तर दिशेला असलेले कोरची व कुरखेडा हे दोन्ही तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यांच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयातच उपचार घ्यावे लागते. बर्याचदा या रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात किंवा नागपूर येथे हलवावे लागते. या दोनही ठिकाणांचे कुरखेडापासूनचे अंतर १०० किमी पेक्षा जास्त आहे. कुरखेडा रूग्णालयात अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका नसल्याने रूग्णाला व त्याच्या नातेवाईकांना अनेक अडचनींचा सामना करावा लागत होता. बर्याचदा रूग्णाचा वाटेतच मृत्यूही होत होता. त्यामुळे रूग्णालयाला अत्याधुनिक सुविधायुक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी कुरखेडा रूग्णालय प्रशासनातर्फे राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाकडे करण्यात आली होती. त्यानुसार कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाला अत्याधुनिक सुविधा असलेली रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेमध्ये ३ डॉक्टर राहणार आहे. यामध्ये एक महिला डॉक्टरचा समावेश आहे. गंभीररित्या जखमी असलेल्या किंवा स्वत: चालु शकत नसलेल्या रूग्णाला रूग्णवाहिकेत चढविण्यासाठी व उतरविण्यासाठी स्ट्रेचर, व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर जीवनरक्षक प्रणाली, रक्तमापक यंत्र आदी सुविधा उपलब्ध आहेत. यापूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र या रूग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा नसल्याने रूग्णाला दुसर्या ठिकाणी हलविते वेळी आवश्यक औषधोपचार होत नव्हता. त्यामुळे बर्याच रूग्णांचा रूग्णवाहिकेतच मृत्यू होत होता. पाच वर्षापूर्वी पुरविण्यात आलेल्या रूग्णवाहिका भंगार झाल्या आहेत. मात्र दुसरी रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जुन्याच रूग्णावाहिकांवर रूग्णांना ने-आण केली जात होती. हिच परिस्थिती जिल्ह्याच्या इतरही रूग्णालयांमध्ये दिसून येते. कुरखेडा रूग्णालयाला रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने रूग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळतील, अशी अपेक्षा केली जात आहे. मात्र या रूग्णवाहिकेची योग्य निगा राखणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा इतर रूग्णवाहिकांप्रमाणे ही रूग्णवाहिकासुद्धा भंगार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाने जिल्ह्यातील रूग्णालयांना आजपर्यंत कोट्यवधी रूपयाची आधुनिक यंत्रसामुग्री पुरविली आहे. मात्र रूग्णालय प्रशासनाने या यंत्रसामुग्रीची योग्य काळजी घेतली नसल्याने त्या बंद असल्याचे दिसून येते. हिच स्थिती रूग्णवाहिकेवर होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)