अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अग्निशमन वाहन न. प.च्या ताफ्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:38+5:302021-07-10T04:25:38+5:30
बाॅक्स ..... २०० मीटर अंतरावर करू शकते मारा अग्निशमन वाहनाला अतिशय माेठे व शक्तिमान इंजिन बसविण्यात आले आहे. त्यामुळे ...
बाॅक्स .....
२०० मीटर अंतरावर करू शकते मारा
अग्निशमन वाहनाला अतिशय माेठे व शक्तिमान इंजिन बसविण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे २०० मीटर अंतरावर अग्निशमन वाहन पाण्याचा मारा करू शकते. पेट्राेल, डिझेल, गॅस यासारख्या ज्वलनशील पदार्थामुळे आग लागली असल्यास फाेम टाकण्याची सुविधा या वाहनात आहे. एखादे घर आतमध्ये असल्यास जवळपास २०० फुटाचा पाइप लावून पाण्याचा मारा करता येते. ३० फुट उंचीची सीडी देण्यात आली आहे.
बाॅक्स .....
स्वतंत्र जनरेटर
वाहनावर ४.५ केव्ही व्हॅट वीजनिर्मिती करणारे स्वतंत्र जनरेटर बसविण्यात आले आहे. हे जनरेटर एअर प्रेशरवर चालते. जवळपास २०० एलईडी लाइटला एकाचवेळी ऊर्जा देण्याची ताकद या जनरेटरमध्ये आहे. तसेच कटर, हॅलाेजन चालविण्यास मदत हाेते. साहित्य ठेवण्यासाठी चार ते पाच कप्पे देण्यात आले आहेत. तसेच अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी प्रशस्त कॅबिन आहे.
बाॅक्स ....
स्वतंत्र अग्निशमन केंद्राची हाेणार निर्मिती
मूल मार्गावरील नगर भवनाच्या परिसरात स्वतंत्र अग्निशमन केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र इमारत बांधले जाणार आहे. वाहनांसाठी शेड तयार केले जाणार आहे. सध्या तीन चालक, सात फायरमन कार्यरत आहेत. स्वतंत्र अग्निशमन केंद्राची निर्मिती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढविली जाईल. अग्निशमन दलाला संपर्क करण्यासाठी नागरिकांनी ०७१३२-२३२१०१ किंवा १०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे.