वर्षभरानंतर आरमोरी येथील स्टेट बँकेचे एटीएम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:55+5:302021-06-24T04:24:55+5:30
आरमोरी येथील स्टेट बँकेचे एटीएम मार्च २०२० पासून नादुरुस्त अवस्थेत होते. एटीएममध्ये एसीचे पाणी गळाल्याने मशीन जळाली होती; परंतु ...
आरमोरी येथील स्टेट बँकेचे एटीएम मार्च २०२० पासून नादुरुस्त अवस्थेत होते. एटीएममध्ये एसीचे पाणी गळाल्याने मशीन जळाली होती; परंतु नादुरुस्त मशीन दुरुस्त करण्याकडे व नवीन मशीन लावण्याकडे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करून पैसे काढण्यासाठी कोरोनाच्या काळातही बँकेत जावे लागत होते. त्यामुळे बँक खातेदारांमध्ये नाराजीचा सूर होता. बँक खातेदारांची समस्या लक्षात घेऊन लोकमतने वृत्त प्रकाशित करून बँक प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण रहाटे व इतर नागरिकांनी बँक प्रशासनाला निवेदनही दिले होते. शेवटी वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर स्टेट बँकेने नवीन मशीन लावून एटीएम सुरू केले.त्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. नवीन एटीएमचा शुभारंभ करताना स्टेट बँकेचे व्यवस्थापक प्रशांत बोधलकर,पवन कळमकर, संजय गुमगावकर, शिशिर कोचे, प्रवीण रहाटे, सचिन रामटेके व ग्राहक उपस्थित होते.
===Photopath===
220621\0911img-20210617-wa0039.jpg
===Caption===
नवीन एटीएम मशीन चा शुभारंभ करताना बँकेचे अधिकारी व कर्मचारी