राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्काराने डाॅ. गभने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:51+5:302021-01-03T04:35:51+5:30
गडचिराेली : महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार देसाईगंज येथील आरोग्य प्रबोधिनीचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश ...
गडचिराेली : महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार देसाईगंज येथील आरोग्य प्रबोधिनीचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश गभने यांना शुक्रवारी देण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या येरमाळा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यात अनेक वर्षांपासून व्यसनमुक्त चळवळ सक्षम व्हावी या विचारातून महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद कार्य करीत आहे. ‘एक दिवस व्यसनमुक्त राष्ट्र, सशक्त राष्ट्र घडो’ या राष्ट्रहिताच्या ध्येयाने कार्यरत आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जाताे. पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदचे राज्य अध्यक्ष डॉ. स॑दीप ता॑बारे, राज्य समन्वयक अजित नेरकर, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भणगे, व्यसनमुक्ती केंद्र समन्वयक आरती पो॑गळे, व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख पल्लवी ता॑बारे उपस्थित होते. आराेग्य प्रबाेधिनीतर्फे गडचिराेली व गाेंदिया जिल्ह्यात काम केले जात आहे.