राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जिल्ह्याला ३५ पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:36 PM2019-02-14T22:36:50+5:302019-02-14T22:37:11+5:30
महाराष्ट्र कराटे अससोसिएशन संलग्नित महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन व आॅल इंडिया कराटे डो फेडेरेशन तर्फे ४० वी महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा नुकताच मुंबईमधील धारावी येथील क्रीडा संकुल मध्ये पार पडली. या स्पर्धेत गडचिरोली कराटे संघातील स्पर्धकांनी सहभाग घेत १९ सुवर्ण पदक, ९ रजत पदक व ७ कास्य पदक अशा तब्बल ३५ पदकांची कमाई करीत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र कराटे अससोसिएशन संलग्नित महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन व आॅल इंडिया कराटे डो फेडेरेशन तर्फे ४० वी महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धा नुकताच मुंबईमधील धारावी येथील क्रीडा संकुल मध्ये पार पडली. या स्पर्धेत गडचिरोली कराटे संघातील स्पर्धकांनी सहभाग घेत १९ सुवर्ण पदक, ९ रजत पदक व ७ कास्य पदक अशा तब्बल ३५ पदकांची कमाई करीत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.
धारावी (मुंबई) येथे पार पडलेल्या अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यातील कराटेपटूंनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धा मुले-मुली सब ज्युनियर, ज्युनियर, कॅडेट, सिनियर वयोगटात पार पडली. यात गडचिरोली कराटे संघाने सहभाग घेऊन गेल्या तीन वर्र्षापासूनच पदक पटकाविण्याची परंपरा कायम राखित इतिहास रचला. यात अनुष्का बिटकर एक सुवर्ण व एक रजत पदक, ऐनम गायगोले एक सुवर्ण व एक रजत, आर्या बिडकर एक रजत, गौरी सालोटकर दोन सुवर्ण पदक, आकांक्षा बन्सोड एक सुवर्ण व एक कास्य पदक, संस्कृती अरसोडे दोन कास्य पदक, अनंतसाई नेदनूरवर दोन कांस्य, सार्थक गेडाम एक सुवर्ण व एक कांस्य पदक, संदेश कुकुडकर एक सुवर्ण व एक रजत पदक, यश नेदनूरवर दोन सुवर्ण, मिलिंदकुमार गेडाम दोन सुवर्ण, सचिन उईके एक सुवर्ण, टीम काता मुलींमध्ये तीन सुवर्ण, टीम काता मुलांमध्ये तीन रजत, टीम कुमीते पाच सुवर्ण पदक, निखिल कांबळे एक रजत, शुभम येनगंटीवार एक रजत असे एकूण ३५ पदकांची कमाई करीत जिल्ह्याचे नावलौकिक केले. तसेच एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपले नाव निश्चित केले आहे.
गडचिरोली जिल्हा क्रीडा कराटे डो अससोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत वाघरे, उपाध्यक्ष रुपराज वाकोडे, सचिव योगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सुयश प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांनी यशाचे श्रेय सेन्साई योगेश चव्हाण, महेंद्र वठी, सोनाली चव्हाण, शिला शिंदे आदींना दिले.