शिळे अन्न जनावरांसाठी घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:40 PM2018-05-07T23:40:07+5:302018-05-07T23:40:07+5:30
लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी अतिशय धोकादायक असून शिळे अन्न खाल्ल्यामुळे शिवणी खुर्द येथील तीन जनावरे नुकतीच दगावली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी अतिशय धोकादायक असून शिळे अन्न खाल्ल्यामुळे शिवणी खुर्द येथील तीन जनावरे नुकतीच दगावली आहेत.
लग्न समारंभात हजारो नागरिकांचा स्वयंपाक केला जातो. बऱ्याचवेळा यातील काही अन्न शिल्लक राहते. सदर अन्न दुसºया दिवशी किंवा तिसºया दिवशी जनावरांना खाऊ घातले जाते. लग्नकार्य दुपारी राहत असल्याने पहाटेलाच स्वयंपाक केला जातो. उन्हाळ्यामध्ये प्रचंड गरमी राहत असल्याने सदर अन्न सायंकाळपर्यंतच टिकू शकते. सायंकाळी गावातील नागरिकांना जेवन दिले जाते. त्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न दुसºया दिवशी सकाळी किंवा सायंकाळी फेकून देण्याऐवजी जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी धोकादायक ठरते.
जनावरांची पचनसंस्था ही मानवी पंचनसंस्थेच्या तुलनेत अतिशय वेगळी राहते. त्यांना गवत जरी व्यवस्थित पचत असले तरी शिजलेले अन्न, तेलकट अन्न पचत नाही. ही बाब काही पशुपालकांना माहीत राहत नाही. त्यामुळे ते जनावरांना पोटभर अन्न खाऊ घालतात. परिणामी अन्न न पचल्याने पोट फुगणे यासारखी लक्षण जनावरांमध्ये दिसून येतात.
बºयाचवेळा प्लास्टिकचे पात्र, द्रोण रस्त्याच्या बाजुला फेकून दिले जातात. जनावरे अन्न खातेवेळी प्लास्टिकचे द्रोण व पात्र सुध्दा खातात. त्यामुळेही जनावरांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आले आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत येणाºया शिवणी खुर्द येथील तीन जनावरे आठ दिवसांपूर्वी दगावली. ही जनावरे एकटांग्या रोगाने दगावली असावी, असा तेथील शेतकºयांचा अंदाज होता. मात्र पशुवैद्यकीय अधिकाºयांनी या जनावरांची तपासणी केली असता, तिन्ही जनावरे शिळे अन्न खाल्याने मृत्यू पावली असल्याचे दिसून आले. या जनावरांमध्ये एकटांग्या रोगाची लक्षणे दिसून आली नाही. मात्र भविष्यातील धोका लक्षात घेऊन १२५ जनावरांना घटसर्प व एकटांग्या रोगाच्या लसी देण्यात आल्या.
लग्नकार्यात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र शिजलेले अन्न जनावरांसाठी धोकादायक राहते. कार्यक्रम आटोपल्यानंतर प्लास्टिकचे पात्र व द्रोण रस्त्याच्या बाजुला फेकले जातात. जनावरे अन्न खाताना प्लास्टिकचे द्रोण व पात्र सुध्दा खातात. यामुळे जनावरांच्या पोटात प्लास्टिकचा गोळा तयार होते. यामुळे जनावरांना धोका राहतो. त्यामुळे प्लास्टिकचे पात्र व द्रोण यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, जेणे करून सदर प्लास्टिक जनावरे खाणार नाही. याबाबत शेतकरी व पशुपालकांनी विशेष खबदारी घ्यावी.
- डॉ. किशोर भदाणे, पशुधन विकास अधिकारी, वैरागड