शाैचालयांसाठी लाखाे रुपये खर्चूनही रस्त्यांवर दुर्गंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:39 AM2021-09-25T04:39:39+5:302021-09-25T04:39:39+5:30

दोन वर्षांपूर्वी हगणदरीमुक्त गाव योजनेंतर्गत स्वच्छ भारत मिशन व इतर याेजनांमधून आष्टा, अंतरंजी, रामपूर, पालोरा या गावांमधील नागरिकांना शाैचालय ...

Stink on the streets despite spending lakhs of rupees for toilets | शाैचालयांसाठी लाखाे रुपये खर्चूनही रस्त्यांवर दुर्गंध

शाैचालयांसाठी लाखाे रुपये खर्चूनही रस्त्यांवर दुर्गंध

Next

दोन वर्षांपूर्वी हगणदरीमुक्त गाव योजनेंतर्गत स्वच्छ भारत मिशन व इतर याेजनांमधून आष्टा, अंतरंजी, रामपूर, पालोरा या गावांमधील नागरिकांना शाैचालय बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. हगणदरीमुक्त गाव योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना शाैचालयाचा वापर व त्याचे फायदे यासंदर्भात उपाययोजना प्रचार, प्रसिद्धी करून कुटुंबाप्रमाणे शौचालयाची व्यवस्था गावागावात करण्यात आली. त्यादरम्यान काहींनी शौचालयाचे बांधकाम केले नाही, तरी त्यांना शाैचालयाचे बिल देण्यात आले. तर काहींना शौचालयाचे बांधकाम अर्धवट असतानाही बिल देण्यात आले. उलट ज्यांनी शाैचालयाचे पूर्ण बांधकाम केले त्यांना मात्र बिलच देण्यात आले नाही. या रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सायकल, दुचाकी थाेडीही रस्त्याच्या बाजूला गेली तर ती विष्ठेने भरते.

Web Title: Stink on the streets despite spending lakhs of rupees for toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.