दारू विक्रेत्यांवर कारवाई करीत अवैध विक्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:33 AM2021-04-05T04:33:02+5:302021-04-05T04:33:02+5:30
निवेदनात म्हटले आहे की, नागुलवाही गावात मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे. यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. गावातील अवैध ...
निवेदनात म्हटले आहे की, नागुलवाही गावात मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे. यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम व नोटिसीच्या माध्यमातून अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गावातील दारूविक्रेत्यांनी नोटिसीला न जुमानता आपला व्यवसाय सुरूच ठेवला. जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू आहे. तसेच साथरोग अधिनियम कायदा व जमावबंदी कायदा लागू असूनही गावात दारूविक्री बंद झालेली नाही.
गावातील १२ दारूविक्रेते सक्रिय असून, त्यांच्यावर कारवाई करीत दारूमुक्त गावासाठी सहकार्य करावे, अशी मागणी मुक्तिपथ गाव संघटनेतर्फे करण्यात आली आहे. निवेदनासोबत गावातील सक्रिय दारू विक्रेत्यांची यादीसुद्धा सादर केली आहे. निवेदनावर सरपंच, तंटामुक्तचे अध्यक्ष, मुक्तिपथ गाव संघटनेचे अध्यक्ष व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.