११ ला विदर्भवाद्यांचा रस्ता रोको
By admin | Published: January 3, 2017 12:52 AM2017-01-03T00:52:30+5:302017-01-03T00:52:30+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ११ जानेवारी रोजी बुधवारी विदर्भभर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
विदर्भवादी आक्रमक : उत्तर गडचिरोली भागात ३ व ४ ला बैठका
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ११ जानेवारी रोजी बुधवारी विदर्भभर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची पूर्व तयारी म्हणून ३ व ४ जानेवारी रोजी उत्तर गडचिरोली भागात विविध ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे यांनी दिली आहे.
४ जानेवारी रोजी कुरखेडा, कोरेगाव चोप, आमगाव, वडसा व आरमोरी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. कुरखेडा येथे सकाळी १०.३० वाजता गुरूदेव सेवा मंडळ कार्यालय, चोप येथे दुपारी २ वाजता ग्रा.पं. सभागृह, आमगाव येथे दुपारी ४ वाजता शिवमंदिर, वडसा येथे सायंकाळी ६ वाजता हनुमान मंदिर कस्तुरबा वार्ड व आरमोरी येथे रात्री ८ वाजता दत्त मंदिरात बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष अॅड. नंदा पराते, नागपूर आघाडी अध्यक्ष अरूण केदार, महिला आघाडी अध्यक्ष संध्या इंगोले मार्गदर्शन करणार आहे. बैठकीला उत्तर गडचिरोली भागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, कुरखेडा तालुका अध्यक्ष गणपत सोनकुसरे, वडसा तालुकाध्यक्ष नामदेव लाडणे, शहर अध्यक्ष लिलाधर भर्रे, शालिक नाकाडे, डॉ. परशुराम खुणे, कमलेश वारस्कर, चिंतामन सहारे, तलदअली सय्यद, राकेश पुरणवार, घिसू पाटील खुणे, वामदेव सोनकुसरे, गौरव नागपुरकर, रामचंद्र रोकडे, नितेश अमलमुरीवार, मुरलीधर लंजे आदी उपस्थित राहणार आहे. या बैठकींना विदर्भवाद्यांनी उपस्थित राहावे व मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अरूण मुनघाटे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)