दारूविक्री बंद करा; अन्यथा दंड ठाेठावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:50+5:302021-09-27T04:39:50+5:30

तुळशी येथे अवैध दारूविक्री गावाच्या माध्यमातून बंद करण्यासाठी गावसभा घेऊन सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. तसेच ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा ...

Stop selling alcohol; Otherwise a fine will be levied | दारूविक्री बंद करा; अन्यथा दंड ठाेठावणार

दारूविक्री बंद करा; अन्यथा दंड ठाेठावणार

googlenewsNext

तुळशी येथे अवैध दारूविक्री गावाच्या माध्यमातून बंद करण्यासाठी गावसभा घेऊन सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. तसेच ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन गावची दारू गावातच कशी बंद करता येईल यावर नियोजन करण्यात आले. त्यानुसार दारूबंदी महिला संघटना व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने गावातून रॅली काढण्यात आली. या वेळी गावात अवैध दारूविक्री बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कोणी चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करताना आढळल्यास किंवा प्राशन करून दिसल्यास गावाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल. या वेळी ‘आमचा गाव, आमचा विकास’, ‘दारूबंदी झालीस पाहिजे’, ‘विक्रेत्यांवर १० हजार तर पिणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड’ अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत दारूबंदी संघटनेच्या ८५ महिला सदस्य, १० पुरुष सदस्य सहभागी झाले होते. सोबतच ग्रामपंचायत सरपंच चक्रधर नाकाडे, उपसरपंच सुरेश तोंडफोडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तेजस्विनी दुनेदार उपस्थित होते.

बाॅक्स

गाेकुळनगरात घराेघरी धडक

जागृती करीत असतानाच तुळशी गावातील मद्यपी गोकुळनगरात जाऊन दारू पित असल्याची माहिती महिलांना प्राप्त झाली असता महिलांनी आपला मोर्चा २ किमी अंतरावर असलेल्या गोकुळनगर गावाकडे वळविला. गावातील अवैध दारूविक्रेत्यांच्या घरोघरी धडक देत गावात अवैध दारूविक्री करू नये, दारूविक्री करताना आढळल्यास पोलिसांच्या स्वाधीन करू, अशी ताकीद या वेळी महिलांनी दिली.

260921\26gad_1_26092021_30.jpg

ग्रामपंचायत कार्यालयासमाेर घाेषणा देताना संघटनेच्या महिला.

Web Title: Stop selling alcohol; Otherwise a fine will be levied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.