वादळाने अनेक नागरिकांंचे नुकसान
By admin | Published: May 27, 2014 12:52 AM2014-05-27T00:52:51+5:302014-05-27T00:52:51+5:30
नवतपांना सुरूवात होताच जिल्ह्याचे तापमान वाढीबरोबरच वादळाने थैमान घातल्याने शेकडो नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी झाडे पडल्याने रस्ता बंद झाल्याच्या
गडचिरोली : नवतपांना सुरूवात होताच जिल्ह्याचे तापमान वाढीबरोबरच वादळाने थैमान घातल्याने शेकडो नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी झाडे पडल्याने रस्ता बंद झाल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. २५ जानेवारीपासून रोहणी नक्षत्राला सुरूवात झाली आहे. पावसाळ्याच्या नक्षत्रापैकी रोहणी हा पहिला नक्षत्र असला तरी या नक्षत्रामध्ये फार क्वचितच जिल्ह्यात पाऊस पडतो. या कालावधीत तापमान अतिशय जास्त राहत असल्याने याला नवतपा म्हणून ओळखले जाते. नवतपांना सुरूवात झाली आहे. आजपर्यंत ४० ते ४१ अंशाच्या जवळपास असलेला तापमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून ४३ अंशाच्यावर गेला आहे. असह्य उकाड्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडणे अशक्य झाले आहेत. त्यामुळे या कालावधीत शहरातील रस्ते सुनसान दिसून येत आहेत. मेहनतीचे काम करणार्या मजुरांसाठी तर उकाडा अत्यंत अडचणीचा झाला आहे. दिवसा ऊन व रात्री सोसाट्याचा वारा यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वारा सुरू झाल्याबरोबर वीज गुल होते. त्यानंतर अख्खी रात्र गर्मीतच काढावी लागत आहे. रविवारच्या सायंकाळी संपूर्ण जिल्ह्यात वादळाने थैमान घातले होते. सायंकाळी ७ वाजता सुरू झालेले वादळ रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होते. सोसाट्याच्या वार्यामुळे आलापल्लीपासून ८ किमी अंतरावरील वीज खांबावर झाड कोसळल्याने सिरोंचा तालुक्यातील वीज पुरवठा रात्रभर बंद होता. गडचिरोली शहरातही वादळाने थैमान घातले. अनेक नागरिकांच्या घरावरील टिन, कवेलू उडून गेले. त्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. मागील आठ दिवसापासून जिल्ह्यात दिवसा प्रचंड तापमान व सायंकाळी वादळ सुटत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वीजा पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. दुर्गम व ग्रामीण भागात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले आहे. दुसर्या गावावरून आलेले तेंदूपत्ता मजूर जंगलामध्येच राहत आहेत. या मजुरांनी ताडपत्रीने बनविलेल्या झोपडीमध्ये आश्रय घेतला आहे. सोसाट्याच्या वार्यामुळे या झोपड्या उडून जात आहेत. (नगर प्रतिनिधी)