कोरची तालुक्याला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:34 AM2021-05-22T04:34:17+5:302021-05-22T04:34:17+5:30
प्रशासनाने नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून पंचनामे केले. त्यामध्ये कोरची शहरातीलच १२ घरांचे ७० हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. बेळगाव ...
प्रशासनाने नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून पंचनामे केले. त्यामध्ये कोरची शहरातीलच १२ घरांचे ७० हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. बेळगाव येथील ५ घरांचे ११ हजार रुपयांचे, सातपुती येथील ३ घरांचे ३४ हजार ५०० रुपये तर मर्केकसा येथील एका घराचे सात हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्व घरांचे मिळून १ लाख १६ हजार रुपयांचे आता नुकसान झाले. तसेच कोरची तहसील कार्यालयाच्या पटांगणात असलेले बीएसएनएल टॉवर कोसळले. तसेच शासकीय आश्रमशाळेतील मुलांच्या वसतिगृहाचे सिमेंटचे पत्रे उडाले व शासकीय गोदामाचे टिनाचे पत्रे उडाले. अनेक विद्युत तारा व खांब तुटल्याने वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले.
मागील वर्षीसुद्धा ३ जूनला वादळाच्या तडाख्याने कोरची तालुक्यातील २५ घरे व ४ गोठ्यांचे एकूण १ लाख ६९ हजार ३१५ रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी व तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्तवासीयांना भेट देऊन त्यांना नुकसानभरपाई मिळवून देणाचे आश्वासन दिले होते, परंतु ते आतापर्यंत मिळाले नाही. यावर्षीही वादळामुळे २१ घरांचे एकूण १ लाख १६ हजार रुपयांचे लोकांचे नुकसान झाले. ते केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.